कोविड निधी वळवला : पार्थ पवार यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाला फटकारले!
-महापालिका प्रशासनाच्या धक्कादायक भूमिकेवर प्रश्नचिन्ह
-नागरिकांचे आरोग्य महत्त्वाचे की सांस्कृतिक कार्यक्रम
पिंपरी। लोकवार्ता-
पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने कोविड कवच योजनेसाठी ठेवलेला निधी सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनासाठी वळवला आहे. शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला हा निधी वळवणे म्हणजे निंदणीय बाब आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते पार्थ पवार यांनी फटकारले आहे.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूवीर सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये स्मृतिचिन्ह देण्याची प्रथा पुन्हा सुरू केली आहे. त्यासाठी कोरोना विषाणू सुरक्षा कवच योजनेच्या लेखाशीर्षामधून ८ लाख रुपये ‘सांस्कृतिक कार्यक्रम’ या लेखाशीर्षावर वळवले आहेत. २०१७ मध्ये महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यानंतर बचतीचे धोरण स्वीकारण्यात आले होते. मात्र, निवडणूक तोंडावर आल्यानंतर प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी आपल्या धोरणात बदल केला आहे.