शुभम चंद्रकांत नखाते यांच्या हस्ते रहाटणी सुकन्या समृद्धी योजनेचे पासबुक वाटप
लोकवार्ता : भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जगत प्रकाश नड्डाजी यांच्या वाढदिवसाचे अवचित्य साधून परिसरात सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत पासबुक वाटप युवानेते शुभम नखाते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शुभम चंद्रकांत नखाते युवा मंच, ज्येष्ठ नागरिक संघ आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

सुकन्या समृद्धी खाते ही मुलींच्या पालकांसाठी भारत सरकार समर्थित बचत योजना आहे. ही योजना पालकांना त्यांच्या मुलीच्या भविष्यातील शिक्षणासाठी निधी तयार करण्यास प्रोत्साहित करते. ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ मोहिमेचा एक भाग म्हणून 22 जानेवारी 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना सुरू केली होती. सुकन्या समृद्धी योजना खाते मुलगी जन्माला येताच ती दहा वर्षाची होईपर्यंत 250 रुपये ठेवीसह उघडू शकतात. सध्या ही योजना 7.6% व्याजदर देत आहे. या योजनेअंतर्गत खाते उघडल्याच्या तारखेपासून 21 वर्षे किंवा मुलगी अठरा वर्षाची होईपर्यंत आणि लग्न होईपर्यंत सक्रिय राहते. या योजनेअंतर्गत पासबुकचे वाटप युवा नेते शुभम नकाते यांच्या हस्ते रहाटणी येथे करण्यात आले. यावेळी या योजनेचे महत्त्व त्यांनी पटवून सांगितले आणि अधिकाधिक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असा आवाहनही केलं.