दिल्लीच्या शाळांमध्ये आता अभ्यासक्रमात ‘देशभक्ती’चा समावेश
दिल्ली सरकारतर्फे शालेय शिक्षणात देशभक्तीच्या अभ्यासक्रमाचा समावेश केला जाणार

लोकवार्ता । प्रतिनिधी
दिल्लीच्या सर्व सरकारी शाळांमध्ये देशभक्तीपर अभ्यासक्रम सुरू केला जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. शहीद भगतसिंग यांच्या जयंतीदिनी २७ सप्टेंबरपासून हा अभ्यासक्रम सुरू केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्वातंत्र्यदिनानिमित्त दिल्ली सचिवालयातून जनतेला संबोधित करताना केजरीवाल यांनी दिल्लीत लवकरच पहिली सैनिकी शाळा व अकादमी सुरू करण्याचीही घोषणा केली.
त्यामुळे दिल्लीतील मुलांचा लष्करी सेवेतील प्रवेश अधिक सुकर होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शाळांमधील देशभक्तीपर केजरीवाल म्हणाले, की, ‘गेल्या ७४ वर्षांपासून आपण मुलांना अभ्यासक्रमात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, इतिहास, भुगोल, गणित आदी विषय शिकवत आहोत; मात्र देशभक्तीचा या अभ्यासक्रमात समावेश नाही. कारण मुलांमध्ये ही भावना निर्माण होईल असे वाटते; मात्र आता शाळेपासूनच मुलांना आपल्या देशाचा अभिमान वाटावा व त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी देशभक्ती विषयाचाही अभ्यासक्रमात समावेश केला जाणार आहे.’ या विषयाची कोणतीही परीक्षा असणार नाही. देशाप्रती कर्तव्याची जाणीव व्हावी, हा यामागचा हेतू आहे.
दरवर्षी २१ जून रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाला सोहळ्यांव्यतिरिक्त फारसे काही घडत नाही. दिल्लीने संपूर्ण जगाला योगासने दिली; पण आता ती नामशेष होत आहे. त्यामुळे दिल्ली सरकारतर्फे योग शिक्षक आणि प्रशिक्षकांची एक मोठी टीम तयार करण्यात येईल. किमान ३०-४० लोकांच्या ज्या गटाला योगा शिकायचा आहे, त्यांना सरकारतर्फे योग प्रशिक्षक दिला जाईल. तसेच हे योगाचे वर्ग सरकारतर्फे चालवले जातील, असेही अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.