बुलडोझर राज ! एका दिवसात दीड लाख चौरस फुटाची अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त
४४ पत्राशेड, ४ वीट बांधकाम, असे ऐकून १ लाख ३१ हजार ९५० चौरस फूट अनधिकृत बांधकामावर बुलडोझर चढवले.

लोकवार्ता : पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत अनधिकृत बांधकामावर कडक कारवाई सुरु आहे. मंगळवारी (दि.७) ब क्षेत्रीय कार्यालयांतर्गत बीआरटी रॉड रावेत येथील अनधिकृत पत्राशेडवर महापालिकेच्या बांधकाम परवानगी आणि अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग व ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय यांनी संयुक्तिक अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. यात ४४ पत्राशेड, ४ वीट बांधकाम, असे ऐकून १ लाख ३१ हजार ९५० चौरस फूट अनधिकृत बांधकामावर बुलडोझर चढवले.
अतिरिक्त आयुक्त जितेंद्र आव्हाड, शहर अभियंता मकरंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली बांधकाम परवानगी आणि अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग संजय घुबे कार्यकारी अभियंता यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे आता प्रशासक राजवटीत बुलडोझर राज सुरु झाले आहे.