लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

PCMC Budget 2023 : समाज विकास विभागासाठी १७१ कोटी ९७ लाख रुपयांची तरतूद

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन २०२३-२४ या आर्थिक वर्षांचा मूळ ५ हजार २९८ कोटी तर केंद्र सरकारच्या पुरस्कृत योजनांसह ७ हजार १२७ कोटी ८८ लाख रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी आज (दि.१४) सादर केला. महापालिकेच्या स्थायी समितीच्या विशेष सभेमध्ये अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, मुख्य लेखाधिकारी जितेंद्र कोळंबे उपस्थित होते.

समाज

या अंदाजपत्रकाची खास वैशिष्टये..
१) मनपाच्या विकासकामांसाठी र.रु. १८०१.५१ कोटी इतक्या रकमेची तरतूद केली आहे.
२) क्षेत्रीय स्तरावरील विकास कामांसाठी तरतूद.
१. अ क्षेत्रीय कार्यालय – र.रु. २३.३५ कोटी.
२. ब क्षेत्रीय कार्यालय – र. रु. १५.८८ कोटी.
३. क क्षेत्रीय कार्यालय – र.रु. ९.९० कोटी.
४. ड क्षेत्रीय कार्यालय – र.रु. १७.११ कोटी.
५. इ क्षेत्रीय कार्यालय – र.रु. ७.०९ कोटी.
६. फ क्षेत्रीय कार्यालय – रु. १५.६५ कोटी.
७. ग क्षेत्रीय कार्यालय – र.रु. २०.१० कोटी.
८. ह क्षेत्रीय कार्यालय – र.रु. ३२.४६ कोटी.
३) स्थापत्य विशेष योजना या लेखाशिर्षातंर्गत र.रु. ८४६ कोटी तरतूद प्रस्तावित आहे.
४) शहरी गरीबांसाठी (BSUP) अंदाजपत्रक तरतूद र.रु. १५८४ कोटी.
५) जेंडर बजेट- महिलांच्या विविध योजनांसाठी तरतूद र.रु. ४८.५४ कोटी.
६) दिव्यांग कल्याणकारी योजना तरतूद र रु ४५ कोटी.
(७) पाणी पुरवठा विशेषनिधी र रु. १५४ कोटी.
(८) PMPML करीता अंदाजपत्रकामध्ये र.रु. २९४ कोटींची तरतूद.
९) भूसंपादना करीता र रु. १२० कोटी तरतूद.
१०) अतिक्रमण निर्मुलन व्यवस्थे करिता र.रु. १० कोटी तरतूद.
११) स्मार्ट सिटीसाठी र.रु. ५० कोटी तरतूद.
१२) अमृत २.० योजनेसाठी र.रु. २० कोटी तरतूद.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रकातील महत्वाची ठळक वैशिष्ठे..

पायाभूत सुविधा प्रकल्प –

• मुख्य प्रशासकीय इमारत ऑटो क्लस्टरचे समोरील जागेत बांधणेत येणार आहे. या इमारतीत तीन तळघरांसह १८ मजले प्रस्तावित आहेत. एकूण बिल्टअप क्षेत्र ९०००० चौ. मी. प्रस्तावित आहे. एकूण ६५० चार चाकी व ३८०० दुचाकी वाहनांच्या पार्किंगची सोय आहे. यामध्ये ३०० सभासद + १५० व्यक्ती बसू शकतील इतक्या क्षमतेचे सभागृह तसेच २१०० कर्मचारी तसेच ६०० नागरिकांसाठी पुरेशी जागा उपलब्ध होणार आहे. सदर इमारतीत इतर सर्व आवश्यक सोयीसुविधा असून पर्यावरणपूरक इमारत असेल.
• मध्यवर्ती अग्निशमन व प्रशिक्षण केंद्र पिंपरी येथील महिंद्रा कंपनीकडून ताब्यात आलेल्या जागेत अत्याधुनिक मध्यवर्ती अग्निशमन व प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी सुमारे १०० कोटी इतका खर्च अपेक्षित आहे.

• मध्यवर्ती ग्रंथालय पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरात मध्यवर्ती ग्रंथालय उपलब्ध नसल्याने प्राधिकरण परिसरात भव्य असे आंतर राष्ट्रीय दर्जाचे ग्रंथालय उभारण्याचे नियोजन केले आहे.
• मोशी येथे हॉस्पिटलची सुमारे ६ हेक्टर जागा ताब्यात आलेली असून तेथे ७५० बेडचे अद्ययावत हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. भविष्यात तेथे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचे नियोजन आहे.
• स्ट्रीट स्केपींग प्रोजेक्ट्स मध्ये रस्त्याचे Urban Street Design नुसार आराखडे तयार करण्यात आले आहेत. यामध्ये पादचा-यांसाठी प्रशस्त पदपथ, पार्किंगसाठी राखीव जागा, झाडे लावणे, सायकलसाठी स्वतंत्र मार्ग सुशोभिकरण करणे याचा समावेश आहे. तसेच यामध्ये जागेच्या उपलब्धतेप्रमाणे Place making करणेत येणार आहे. यामुळे नागरिकांना पदपथावरुन चालणे सुलभ होणार आहे. तसेच सायकल चालविणेस प्रोत्साहन मिळेल. प्रदुषण कमी होऊन शहराच्या सौंदर्यात भर पडेल.
१) मुंबई-पुणे रस्ता १२.कि.मी.
२) टेल्को रस्ता (यशवंतनगर चौक ते फिलिप्स चौक) ३.५.कि.मी.
३) धर्मराज चौक ते इस्कॉन मंदिर, रावेत १.२० कि.मी.
४) बिर्ला हॉस्पिटल ते डांगे चौक ९.८० कि.मी.
• मोशी येथे सुमारे १२ एकर जागेवर विविध खेळांसाठी भव्य स्टेडीयम उभारण्याचे नियोजन आहे. सदर स्टेडीयममध्ये स्पोर्टस क्लबचे नियोजन करण्यात आले आहे.
• पिंपरी डेअरी फार्म रेल्वे उड्डाण पुलामुळे मुंबई-पुणे रस्ता पिंपरी परिसरास थेट जोडणेत येणार आहे. यामुळे सध्याच्या पुलावरील वाहतुकीचा ताण कमी होईल. मुंबई-पुणे रस्त्यावरून पिंपरी पुढे पिंपळे सौदागरकडे जाणे सोयीचे होईल.
• वाल्हेकरवाडी ते औध रावेत रस्ता पूल व पोहोच रस्ते यामुळे वाल्हेकरवाडी ते ताथवडे येथील औध रावेत रस्ता जोडला जाणार आहे. यामुळे चिंचवड थेरगाव रस्त्यावरील वाहतूकीचा ताण कमी होईल. यासाठी ताथवडे येथील पशुसंवर्धन विभागाची जागा मनपास देणेस तत्वतः मान्यता मिळाली आहे.
सन २०२३-२०२४ चे अंदाजपत्रकात सुमारे ५० कि.मी. लांबीच्या रस्त्यांचे नव्याने बांधकाम/ रुंदीकरण / मजबूतीकरण प्रस्तावित आहे.
• प्रभाग क्र. ३० मधील नाशिकफाटा स.नं. ५०२ ते स.नं.४९६ पर्यंत पवना नदीलगत शंकर मंदिर ते पिंपळे गुरव पुलापर्यंतचा रस्ता अद्यावत पध्दतीने विकसित करणे. (टप्पा-१)
• प्रभाग क्र. १ चिखली येथील आरक्षण क्र. १/९६ मध्ये टाऊन हॉल विकसित करणे.
• प्रभाग क्र. १० मधील महात्मा ज्योतीराव फुले पुतळयाशेजारी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुर्णाकृती पुतळा उभारणे कामी स्मारकाचे सुशोभिकरण करणे करिता स्थापत्य विषयक कामे करणे.
• प्रभाग क्र. २५ वाकड येथील आरक्षण क्र. ४/२३ मध्ये शाळेची उर्वरीत कामे करणे.
• दापोडी येथील हुतात्मा भगतसिंग शाळे करीता नवीन शाळा इमारत बांधणे.
• प्रभाग क्रमांक 50 मध्ये पवना नदीवर थेरगाव, चिंचवड येथील प्रसुधाम सोसायटी जवळ विकास आराखड्यातील 18.0 मीटर रुंदीचा बटरफ्लाय पुलाचे बांधकाम करणे,
• पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट प्रोग्रामशी संबंधित वायसीएम हॉस्पिटलमधील प्रस्तावित काम नवजात शिशु अतिदक्षता विभागाचे नूतनीकरण आणि डॉक्टरांच्या निवासस्थानाचे नूतनीकरण करण्याचे काम नियोजित आहे.
• पाणी पुरवठा
• भामा आसखेड प्रकल्पात धरणाजवळ मौजे वाकी तर्फे वाडा येथे अशुद्ध जलउपसा केंद्र बांधणे व त्यासाठी जॅकवेल सह पंप हाऊस, ब्रिज, इंटेक चॅनल बांधणे व इतर अनुषंगिक कामे करणे हे काम विद्युत यांत्रिकी Instrumentation व SCADA याविषयी कामाचा समावेश करण्याचे नियोजन आहे.
• आंद्रा प्रकल्पाद्वारे पाणीपुरवठा विषयक सुधारणा व नवीन १०० द.ल.लि. प्रतिदिन पाण्याची उपलब्धता करण्यासाठी आंद्रा धरणाजवळ अशुद्ध जलउपसा केंद्र बांधणे व त्यासाठी जॅकवेल सह पंप हाऊस, ब्रिज, इंटेक चॅनल बांधणे व इतर अनुषंगिक कामे करणे तसेच आंद्रा येथील अशुध्द जलउपसा केंद्रापासून ते नवलाख उंब्रे येथील बीपीटी पर्यंत रायझिंग मेन टाकणे व बीपीटी बांधणे ही कामे प्रस्तावित आहेत.
• शहरातील दुर्गादेवी टेकडी सर्वात उंच ठिकाण असून सदर ठिकाणी १६ द.ल.लि. क्षमतेची साठवण टाकी (GSR) व से. २३ निगडी येथे वाढीव क्षमतेचे नवीन पंप बसविणे व १४०० मिमी. व्यासाच्या २ समांतर उद्धरण नलिका व १५०० मिमी व १२०० मिमी. व्यासाची समांतर गुरुत्वनलिका टाकणे हे काम सन २०२३-२४ चे अंदाजपत्रकात दुर्गादिवी प्रकल्प प्रस्तावित केले आहे.
• से. २३ जलशुध्दीकरण केंद्रपासून सांगवी दापोडी पर्यंत थेट १००० ते ६०० मि. मी. व्यासाची MS पाईप लाईन टाकल्याने सांगवी दापोडी सारख्या शेवटच्या भागाचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे तसचे हायवेलगतच्या चिंचवड, आनंद नगर झोपडपट्टी, Empire Estate, Empire Square, मोहन नगर, मोरवाडी, कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी, जुनी सांगवी या भागास होईल. यास्तव वाढीव पाणी मागणी पुरवठा करणे शक्य होणार असून सदर प्रकल्पाचा याकामी फायदा होणार आहे.

वैद्यकीय
• मोशी येथे नव्याने ७५० बेड्सचे नविन रुग्णालय प्रस्तावित आहे. तसेच वैद्यकीय महाविद्यालय (MBBS) प्रस्तावित आहे.
• मासुळकर कॉलनी येथे नेत्र रुग्णालय लवकरच सुरु करण्यात येत आहे.
• तालेरा रुग्णालय येथे नविन रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात असुन मल्टिस्पेशालिटी सेवा सुरु करण्यात येणार आहेत.
• नविन तालेरा रुग्णालय सुरु केल्यानंतर सद्यस्थितीतील जुने तालेरा रुग्णालयामध्ये Geriatric रुग्णालय (वृद्धांकरिता) सुरु करण्यात प्रस्तावित आहे.
• पी.पी.पी. तत्वावर कॅन्सर रुग्णालय सुरु करणेकामी प्रस्तावित आहे.
• Social Impact Bond च्या माध्यमातून आरोग्य सेवांचा दर्जा वाढवून सर्व रुग्णालय व दवाखाने NABH प्रमाणित करणेकामी प्रस्तावित आहे.
• थेरगाव रुग्णालयामध्ये ट्रामा सेंटर तसेच पुर्ण क्षमतेने सर्जरी, नेत्रविभाग तसेच कान, नाक, घसा शस्त्रक्रिया विभाग सुरु करण्यात येणार आहे.
• कै. ह.भ.प. प्रभाकर मल्हारराव कुटे आकुर्डी रुग्णालय येथे डायलासिस, सर्जरी व अस्थिरोग विभाग सुरु करणे प्रस्तावित आहे.
• नविन भोसरी येथे NICU, कान, नाक, घसा व सर्जरी विभाग सुरु करणे प्रस्तावित आहे..
• वाय. सी. एम. रुग्णालय अद्यायावत करणेकामी प्रस्तावित आहे.
• मनपाच्या सर्व रुग्णालयामध्ये दंतचिकित्सक सुविधा सुरु करण्यात येणार असून वाय. सी. एम. एच. येथे अत्याधुनिक डेंटल सुविधा सुरु करणे प्रस्तावित आहे.
• Medtech Qure.AI+Niramai Equipment – पिंपरी चिंचवड महानगरपालिका नवीन ए आय (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून स्क्रीनिंग आणि डायग्नोस्टिक्स सुधारण्यासाठी एक पाऊल पुढे येत आहे.
पर्यावरण अभियांत्रिकी, जलनि:सारण व आरोग्य
• झोपडपट्टी स्वच्छ करण्यासाठी शून्य कचरा झोपडपट्टी मॉडेल सुरू करण्यात आले आहे. ज्यामध्ये महिला गट घरोघरी कचरा संकलनाची जबाबदारी घेत आहे आणि कचरा वर्गीकरण, स्वच्छता आणि आरोग्य पर्यावरणाचे महत्व यावर IEC उपक्रम राबवतात.
• शून्य कचरा झोपडपट्टी उपक्रमाचा उद्देश झोपडपट्टीतील प्रत्येक घरापर्यंत पोहोचणे आणि महिला गटांना उपजीविकेची संधी उपलब्ध करून देणे आहे. महिला गटांना प्रोत्साहन देण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत त्यांना दरमहा मोबदला दिला जाईल. व यांत्रिक मॅन्युअल कचरा कंपोस्टिंग मशीन उपलब्ध करण्यात येईल.
• जलस्त्रोतांचे पुनरुज्जीवन करणे अंतर्गत गणेश नगर, बर्ड व्हॅली, भोसरी आणि चिखली येथील जलस्रोताची गुणवत्ता सुधारण्यासाठी महानगरपालिका काम करणार आहे. १५ वा वित्त आयोग आणि अमृत या योजने अंतर्गत प्राप्त निधीमधून या संदर्भातील कामे करण्याचे नियोजित आहे.
• नवी दिशा महिला गटांना स्वच्छतागृहाचे नूतनीकरण करण्यासाठी आवश्यकतेनुसार निधी दिला जाईल आणि नवी दिशा” अंतर्गत सामुदायिक शौचालय सुरळीतपणे चालवण्यासाठी आवश्यक वस्तू उपलब्ध करून देण्यात येतील. विद्यमान गटांना प्रेरित करण्यासाठी आणि नवीन गटांना नवी दिशा उपक्रमात सहभागी होण्यासाठी नवी दिशा स्पर्धा आयोजित करून विजेत्यांना प्रोत्साहन दिले जाईल.
• नदी पुनरुज्जीवन प्रकल्प अंतर्गत पिंपरी चिंचवड शहरातून वाहणा-या मुळा, पवना व इंद्रायणी या नद्यांच्या पुनरूज्जीवनासाठी कर्ज रोख्याद्वारे निधी उभारण्यास शासनाने मंजूरी दिली असून सन २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये सदरची कामे हाती घेण्यात येणार आहेत.
मुळा नदी वाकड पूल ते सांगवी या ८.८० किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्याचे काम एप्रिल २०२३ पासून सुरु करण्यात येणार आहे.
• ऊर्जेच्या पर्यायी खोतांसाठी पर्याय वाढवण्याच्या दृष्टीने मोशीमध्ये 700TPD क्षमतेचा 14MW विज निर्मितीचा WTE प्रकल्प अंतिम टप्प्यात असुन माहे मे २०२३ पासून प्रकल्प कार्यान्वियीत करण्याचे नियोजन आहे.
• शहरामध्ये आरोग्यदायी वातावरण आणि स्वच्छता राखण्यासाठी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका (Mechanized Sweeping Machines ) यांत्रिक स्विपिंग मशीन खरेदी करत आहे. ही यंत्रे 670 किमी क्षेत्र व्यापतील आणि PM 2.5 आणि PM 10 मानांकाच्या सभोवतालच्या हवेच्या गुणवत्तेचे पालन करतील.
• हॉटेलमधील कच-याचे बायोगॅसमध्ये रुपांतर करण्यात येणार असून त्यासाठीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. एप्रिल २०२३ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.
• 200TPD क्षमतेचा C&D कचरा प्रक्रिया प्रकल्प यावर्षी कार्यरत होईल.
• मोशीतील ३० वर्षापासून ३ लाख घनमीटर कच-याचे बायोमायनिंग पूर्ण झाले आहे. उर्वरीत कामकाज डिसेंबर २०२३ मध्ये पूर्ण होईल. या प्रकल्पाच्या दुस-या टप्प्याचे काम माहे एप्रिल २०२३ पासून सुरु होईल आणि माहे एप्रिल २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
• अमृत 1.0 या योजने अंतर्गत पिंपळे निलख येथे १२ एमएलडी, बोपखेल येथे ५ एमएलडी, चिखली येथे १२ एमएलडी क्षमतेच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.
• अमृत 2.0 योजनेअंतर्गत भोसरी दिघी परिसरात ४५ एमएलडी क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची उभारणी करणेचे प्रस्तावित आहे.
• शहरात घनकचरा व्यवस्थापना साठी महानगरपालिकेने ८ मुख्य ठिकाणे निश्चित केले आहेत, त्या ठिकाणी बेस्ट ट्रान्सफर सेंटर्सची स्थापना करण्याचे नियोजन असून एकुण ८ पैकी कासारवाडी, काळेवाडी आणि नेहरूनगर या ३ केंद्राचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.
• राष्ट्रीय शुध्द हवा कार्यक्रमाचे (NCAP) प्रभावी अंमलबजावणीसाठी शहरात विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्यामध्ये शहरातील जास्त रहदारी असणा-या सुमारे ५ चौकांमध्ये हवा प्रदूषण कमी करणेसाठी मिस्ट टाईप वॉटर फाऊंटन उभारणेचे नियोजन आहे.
• प्रति दिवस ४ टन Domestic Hazardous Waste व Sanitary Waste क्षमतेचे दोन प्रकल्प उभारून कचऱ्यावर प्रक्रिया करणेचे नियोजन आहे. त्याचप्रमाणे अत्याधुनिक पध्दतीचे Canon Dust Suppression. Unit कार्यान्वित करणेचे नियोजन आहे.
• उद्याने – पिंपरी चिंचवड हे औद्योगिक शहर असलेने शहराच्या पर्यावरणाच्या दृष्टिने व नागरीक व लहान मुलांच्या मनोरंजनासाठी शहरात मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारची उदयान विकासित केलेली आहेत. सहस्थित मनपा च्या परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी विविध प्रकारची एकुण १९४ उद्याने ४७४ एकर क्षेत्रावर विकसित केलेली आहेत.

• रस्ते सुशोभिकरण – सद्धस्थीत विविध रस्त्याचे मंजुर विकास आराखड्याप्रमाणे रूंदीकरण चालू असून रूंदीकरणातील उपलब्ध जागेवर रस्त्याचे दुतर्फा सुशोभिकरण हाती घेणेत आले आहे. आत्तापर्यंत ११० कि.मी. लांबीवर सुशोभिकरण करणेत आले असुन १) भक्ती शक्ती ते किवळे ३)च-होली परीसर ४ ) डांगे चौक ते साई चौकमधील रस्ते सुशोभित करावयाचे नियोजन चालु आहे. यामध्ये iconic (एकाच प्रजातीचे) पध्दतीने वृक्ष लागवड करणेचे नियोजित आहे.

• वनीकरण – सद्यस्थितीत शहराच्या ग्रीन कव्हर मध्ये वाढ होण्याच्या दृष्टिने शहरातील मोठ्या जागा, रस्ते, इमारती, शहरालगतच्या मिलीटरी हद्दीमध्ये इ. ठिकाणी सन २०२२-२३ या वर्षामध्ये ३,४०,००० वृक्षारोपणाचे उद्दीष्ट पुर्ण करणेत आलेले असुन पुढील वर्षी सन (२०२३-२४) २,००,००० वृक्षारोपणाचे उद्दीष्ट ठेवणेत आले आहे.

• पिपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मालकीचे विविध ठिकाणची उद्याने विकसित करून सदर उद्यानामध्ये सर्व प्रकारच्या सेवा, सुविधा व विरंगुळा एकाच ठिकाणी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने अशी उद्याने सार्वजनिक खाजगी भागिदारी तत्त्वावर चालविणेकरिता देण्यात येतील. त्यामुळे सदर उद्यानावरील होणा-या खर्चाची बचत होऊन महानगरपालिकेस अतिरिक्त उत्पन्न मिळेल तसेच खाजगी नियंत्रकामार्फत संपूर्ण उद्यानाचे व्यवस्थापन करण्यात आल्यामुळे पिपरी चिंचवड महानगरपालिकेचा प्रशासकीय भार कमी होईल.

• मियाबाकी प्रकल्प – सन २०२२-२३ मध्ये दिघी गावराण येथे १७ एकर क्षेत्रावर ४०,००० मियाबाकी पध्दतीने वृक्षारोपण करणेत आलेले असुन घनवन निर्माण झालेले आहे. व सन २०२३-२४ मध्ये ०१ लक्ष वृक्षांची लागवड सुरू करणेत आलेली आहे.
• जैवविविधता उद्यान (biodiversity park) तळवडे गायराण येथे ८ एकर क्षेत्रावर जैवविविधता उद्यान (biodiversity park) उभारणेत आलेले आहे. त्याचप्रमाणे उर्वरीत क्षेत्रावर सन २०२३ २४ या वर्षामध्ये पुर्ण करणेचे नियोजित आहे.
• दुर्गादेवी टेकडी उद्यान अद्ययावत पद्धतीने विकसीत करून सदर उद्याना मध्ये दुर्मिळ देशी झाडांचे संगोपन व त्याचा प्रसार करण्यासाठी वृक्षांची लागवड करुन त्यांच्या मार्फत अन्य ठिकाणी या प्रजातीचे जतन करण्याचे नियोजन आहे.
विद्युत

• पिंपरी चिंचवड महानगरपालिका येत्या कालावधीत ईव्ही सज्ज शहर होण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहे. त्या अंतर्गत सार्वजनिक खाजगी भागिदारी तत्वावर शहरात २२ ईव्ही चार्जिंग स्टेशन्स उभारण्याची कार्यवाही सुरू आहे. व तदनंतर चार्जिंग स्टेशन्स वाढवण्याचे नियोजन आहे. इतर EV उपक्रमांपैकी महानगरपालिका EV रेडिनेस प्लॅन तयार करत आहे.
• महानगरपालिकेच्या आवारात चार्जिंग स्टेशन्स स्थापित करण्यासाठी आणि महानगरपलिकेच्या अधिका-यांकडून EV चा अवलंब करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी पावले उचलली जात आहेत.
• च-होली, निगडी, हिंजवडी या ठिकाणी 16MW इलेक्ट्रीक बस करिता चार्जिंग स्टेशनसाठी बीजपुरवठा देणेचे काम अंतिम टप्पयापर्यंत होत आले आहे.
• 3MW चा सौर उर्जा प्रकल्प महानगरपालिका क्षेत्रातील इमारतींच्या छतावर बसवण्यात येणार आहे. ज्यातून महानगरपालिकेची ३.५२ कोटी ची विज बचत होईल.
• महानगरपालिकेच्या विविध उड्डाण पुलावर रंगीत प्रकाश व्यवस्था विषयक कामे करून उड्डाण पुलांचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे.
• अग्निशमन
• मौजे पिंपरी येथे मध्यवर्ती अग्निशमन व आणीबाणी नियंत्रण कक्ष तथा मुख्यालय व अग्निशमन प्रशिक्षण केंद्र इमारत उभारणेत येणार असून त्यामध्ये अग्निशामक दलाचे ८ ते १० अग्निशामक वाहने “ एकाच वेळी टर्नआऊट सुविधा, नियंत्रण कक्ष, अग्निशमन प्रशासकिय इमारत, वाहन दुरूस्ती कार्यशाळा, स्वतंत्र ट्रेनिंग सेंटर, ड्रिल टॉवर तसेच आपत्कालिन व्यवस्थापन केंद्र व नियंत्रण कक्ष व अधिकारी कर्मचा-यांकरीता ३२० निवासस्थाने यांचा समावेश असणार आहे.
• सर्वे नं. १७/१ पी. चोविसावाडी च-होली, आरक्षण क्र. २/१४५ सर्वे नं. ५ पै. दिघी, सर्वे नं. १३/१/१, १२/५.२. प्रभाग क्र. २५ पुनावळे, FII Block MIDC, भोसरी येथे नविन ४ उप अग्निशमन केंद्र उभारण्याचे कामकाज चालू आहे.
• अग्निशमन विभागाकडे सध्य स्थितीत वाहन संख्या कमी असल्याने, नविन अत्याधुनिक साधन सामुग्री असलेले एकुण १३ विविध प्रकारचे अग्निशमन वाहने खरेदी करणेत येणार आहेत त्यामध्ये ५४ मीटर व ३२ मीटर उंचीचे TTL Fire Vehicle, ७० मीटर उंचीचे Airel Ladder Platform fire Vehicle, फायर टेंडर, वॉटर कॅनन, अडव्हॉन्स रेस्क्यु व्हॅन, फोम टेंडर व डीसीपी टेंडर चा समावेश आहे.
• National Disaster Management Authority (NDMA) यांचे निकषानुसार अग्निशमन विभागाचे अत्यावश्यक कामकाजा करीता आवश्यक असलेले विविध ८६ प्रकारचे अत्याधुनिक अग्निशमन व विमोचन साहित्य/ उपकरणे खरेदी करावयाची प्रशासकिय कार्यवाही प्रस्तावित आहे.
• अग्निशमन सेवेस अत्याधुनिक पध्दतीने सेवा सुविधा पुरविणेकामी इंटरनेट, जीपीएस, आलाम नेव्हीगेशन सिस्टीम, लोकांना आगी बाबत आगाऊ सूचना देणारी यंत्रणा, संगणक व सॅटेलाईट सारख्या अत्याधुनिक उपकरणाचा तंत्रज्ञानाचा डिजीटल व इलेक्ट्रोनिक प्लॅटफॉर्मवरील सॉफ्टवेअरचा उपयोग करून अग्निशमन कार्यास प्रतिसाद देणा-या यंत्रणा व तंत्रज्ञान वापरण्याची तांत्रीक यंत्रणा त्रयस्त संस्थेमार्फत बसविणे आवश्यक असून, I. T. Enable Fire Response System ची कार्यवाही प्रस्तावित आहे.
• मनपा कार्यक्षेत्रातील विविध प्रकारचे धोके व आपत्तीजनक परिसर ओळखने आवश्यक असून, सदर परिसरातील झोपडपट्ट्या, भंगार गोडावून, धोकादायक अथवा ज्वलनशिल पदार्थ हाताळणा-या औद्योगिक कंपन्या कारखाने, नदी पात्रालगत पूर संभाव्य परिस्थितीमध्ये पाणी भरणारा परिसर, अरूंद रस्ते असलेली दाट निवासी वस्ती, यांसारख्या धोकादायक म्हणजेच पूर, भूकंप, आग तथा मनुष्य निर्मात आपत्तीच्या प्रसंगी संभाव्य अडथळे व अडचणी टाळणेकामी सुरक्षिततेच्या उपायोजना करणेकरीता सदर मनपा परिसराचे विशेष तांत्रीक त्रयस्त संस्थेमार्फत असुरक्षितता मुल्यांकन( Vulnerability Assessment) करण्यात येणार आहे.
• समाज विकास
• समाज विकास विभागामार्फत विविध प्रकारच्या समाज कल्याणकारी योजना राबविल्या जातात त्या खालील प्रमाणे
• महिला व बालकल्याण योजने अंतर्गत
• उड्डान-
– महिला संसाधन केंद्र (One Stop Centre) कौटुंबिक हिंसाचार / पिडीत / घटस्पोटित व अत्याचारित महिला वर्गास एकाच ठिकाणी समुपदेशन, कायदेशीर सल्ला व वैद्यकीय सुविधा
– युवतींना परदेशी उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्य
– स्पर्धा परिक्षा देणा-या युवतींना शासकीय / खाजगी संस्थांमध्ये प्रवेश / स्पर्धा परिक्षांसाठी अर्थसहाय्य
– किशोरवयीन मुली व महिलांचे आरोग्य सुधारण्यासाठी सोई-सुविधा उपलब्ध करून देणे.
– महिलांसाठी ज्ञान कौशल्य वाढ प्रशिक्षण कार्यक्रम व प्रगत प्रशिक्षण (Advance Training)
– शहरातील नोकरी करणा-या व शिक्षण घेणा-या महिला वसतीगृहात राहत असल्यास अर्थसहाय्य.
उमेद जागर-
– कोरोना मधील विधवा महिला बचत गट स्थापन करून त्यांना प्रशिक्षण देवुन रोजगार उपलब्ध होण्यासाठी स्टीचिंग युनिट
– व्यवसायासाठी आवश्यक असणारी साधन सामुग्री व भांडवल उपलब्ध करून देणे.
– या महिलांना उत्पादित मालासाठी शासकीय / खाजगी बाजारपेठ उपलब्ध करून देणे.
– विधवा आणि अनुसूचित जाती/जमातीच्या महिलांसाठी राखीव असलेल्या निवासस्थानाचा काही भाग नोकरदार महिलांसाठी “सावित्रीबाई फुले कामगार महिला वसतिगृह” म्हणून देण्याचे नियोजन आहे.
• महाराष्ट्र शासनाच्या “लेक लाडकी” या योजनेअंतर्गत देण्यात येणा-या रक्कमेप्रमाणेच महानगरपालिकेमार्फत तेवढ्याच रक्कमे इतकी पुरक रक्कम देण्यात येणार आहे.

• दिव्यांग कल्याणकारी योजने अंतर्गत
– पिंपरी चिंचवड शहरातील सर्व दिव्यांग नागरीकांचे सर्वेक्षण करणे.
– ० ते ६ वयोगटातील मुलांचे “लवकर निदान व लवकर उपचार” (Early Detection & Early Intervention) या साठी प्रणाली विकसीत करणे.
– शहरातील सर्व दिव्यांग नागरीकांसाठी थेरपी युक्त, समुपदेशन केंद्र व सर्व उपचार.
– सेन्सरी गार्डनसह सर्व सोई-सुविधा युक्त महाराष्ट्रातील पहिले दिव्यांग भवन
– शहरातील विशेष मुलांसाठीच्या निरामय आरोग्य योजनेच्या विम्याची रक्कम मनपा मार्फत अदा केली जाणार.
– मनपा हद्दीतील दिव्यांग नागरीकांचे सक्षमीकरण / सामाजिक समावेशन करणेसाठी प्रगत प्रशिक्षण.

• मागासवर्गीय कल्याणकारी योजना
– पिंपरी चिंचवड शहरातील युवक/युवतींना परदेशी / देशाअंतर्गत उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्य.
– इ. ५ वी ते इ. १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती.
– मागासवर्गीय युवक/युवतींना विविध व्यवसाय / प्रगत प्रशिक्षण,
– मागासवर्गीय विद्यार्थी / विद्यार्थीनीसाठी स्पर्धा परिक्षाकरीता पुस्तक संच वाटप.
– शालेय विद्यार्थी / विद्यार्थीनीसाठी सायकल वाटप,

• इतर कल्याणकारी योजना
– ज्येष्ठ नागरीक – ज्येष्ठ नागरीक दिनांचे आयोजन व ज्येष्ठ नागरीकांना विरंगुळा केंद्रात उपयोगी वस्तु वाटप.
– तृतीयपंथी- आंतरराष्ट्रीय तृतीयपंथी दिनांचे आयोजन व वय वर्ष ५० पुढील तृतीय पंथीयांसाठी पेन्शन व रोजगार उपलब्ध करून देणारी एकमेव महानगरपालिका.
– बेघर निवारा केंद्र – पिंपरी चिंचवड शहरात आढळणा-या बेघर व्यक्तीसाठी सावली निवारा केंद्र” येथे वैद्यकीय उपचार, निवास, भोजन, करमणुक यासह १११ बेघर व्यक्तींना निवास व्यवस्था.
– शालेय विद्यार्थी इ.१० वी व इ. १२ वी मध्ये गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्याना प्रोत्साहनात्मक बक्षिस रक्कम.
– शहरातील एचआयव्ही बाधित मुलांचा सांभाळ करणा-या पालकांना / संस्थांना अर्थसहाय्य.

• लाईट हाऊस –
– पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील १८ ते ३५ वयोगटातील युवक / युवतींना मोफत प्रशिक्षण देवून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार निर्मिती उपक्रम प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात १ या प्रमाणे ८ लाईट हाऊस निर्माण करण्यात येणार असून सध्या २ लाईट हाऊस प्रकल्प कार्यन्वित ६ प्रस्तावित

• शिक्षण विषयक
• QCI ( क्वॉलिटी कंट्रोल ऑफ इंडिया)- क्वॉलिटी कंट्रोल ऑफ इंडिया यांचेसोबत तीन वर्षांसाठी करारनामा केलेला आहे. यामध्ये विदयार्थी व शिक्षकांचे मूल्यांकन १००% करणेत येणार आहे. मूल्यांकन केलेनंतर निकालातील त्रुटी लक्षात घेवून शैक्षणिक गुणवत्ता सुधारणा करणेसाठी प्रशिक्षण दिले जाईल.
• स्मार्ट हेल्थकेअर शैक्षणिक वर्षात RBSK कडून जुलै, ऑगस्ट व मनपा हॉस्पिटल मार्फत डिसेंबर, जानेवारी या महिन्यात सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करणेसाठी वेळापत्रक तयार केले आहे. ज्या विद्यार्थ्यांमध्ये शारिरीक दोष असतील त्यांचेवर तातडीने उपचार केले जातील.
• जल्लोष शिक्षणाचा मनपा शाळांमधील विदयार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक, गुणात्मक, नाविण्यपूर्ण विचारवाढीकरीता विदयार्थी व शाळा स्तरावर स्पर्धेचे आयोजन करणे यामध्ये शाळा स्पर्धा, विदयार्थी स्पर्धा व शिक्षणोत्सव (Carnival) चे आयोजन करणे.
• PMU( प्रकल्प व्यवस्थापन गट)- शिक्षण विभाग येथे २ व क्षेत्रीय स्तरावर ५ मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. शिक्षक, मुख्याध्यापक, CSR अंतर्गत राबविले जाणारे विविध प्रकल्प यांच्यामध्ये समन्वय साधने, माहिती आधारीत Goul Vision बाबत नियोजन करणे, शाळांमध्ये विविध उपक्रमांचे मूल्यांकन करणे, नविन प्रस्ताव तयार करणे, शिक्षण विषयक पद्धतीमध्ये सुधारणा करणे, तसेच बालवाडी/मनपा शाळांची गुणवत्ता वाढीस मदत करणे.
• ग्रंथालय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी तसेच विविध विषयांबाबत सामान्य ज्ञानामध्ये भर पडावी. वेगवेगळे साहित्य, लेखक व लेखनविषयक ओळख व्हावी. यामधून विदयार्थ्यांचे विचार लेखनाद्वारे मांडण्यास प्रेरणा मिळते यासाठी १२८ शाळांना ग्रंथालय सुविधा उपलब्ध करून देणे.
• भारतदर्शन अभ्यासदौरा इ.५ वी व इ.८ वी शिष्यवृत्ती परिक्षेमध्ये राज्य स्तरावर / गुणवत्ता यादीमध्ये येणा-या विदयार्थ्यांना भारतातील जिल्हास्तरावर कला, संस्कृती, इतिहास, संग्रहालय, विज्ञान व संशोधन विषयक स्थळांची अनुभवजन्य माहिती होण्यासाठी प्रतिवर्षी अभ्यासदौ-याचे आयोजन करण्यात येणार आहे.
• कौन्सिलर १२८ शाळांमधील पाच शाळाचा एक गट याप्रमाणे कौन्सिलर उपलब्ध करून देण्याचे नियोजित आहे. त्यामुळे विदयार्थ्यांचे शालेय. मानसिक आरोग्य संवर्धन होईल.
• भौतिक सुविधा मनपाच्या १२८ शाळांमध्ये उपलब्ध भौतीक सुविधांचे विश्लेषण करण्यात आले आहे. यामध्ये शौचालय, ग्रंथालय, पिण्याचे पाण्याची सुविधा, वर्गखोल्या, मैदान, सुरक्षाभित, प्रयोगशाळा, स्मार्ट स्कुल, बालाप्रकल्प व क्रीडासुविधा इ. यांची सर्व शाळांमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
• आर्टस/स्पोर्टस- सर्वाधिक पटसंख्या असणा-या २५ शाळांमध्ये विदयार्थ्यांमधील सृर्जनशिलतेमध्ये वाढ व्हावी यासाठी नृत्य, गायन, वादन, चित्रकला या विषयातील कला शिक्षकांची तसेच विविध क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण देण्यासाठी क्रीडा शिक्षकांची नेमणूक शैक्षणिक वर्ष २०२३ २०२४ पासून करण्यात येणार आहे.
• पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत Sustainability Cell निर्माण करणेत आला आहे. या सेलच्या अंतर्गत येणारे विविध उपक्रम हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फ्रेमवर्कशी संरेखित असून यामध्ये माझी वसुंधरा अभियान, अर्बन आऊटकम फ्रेमवर्क, शाश्वत विकास करणे ही उद्दिष्टे आहेत.
• सदरचा Sustainability Cell शहराचे उच्चांक वाढविण्यासाठी व उद्दिष्ट साध्य करण्यासाठी क्षेत्र तज्ञ, स्वयंसेवी संस्था व नागरिक यांच्या सोबत एकत्रितपणे कामकाज करतील.
• Sustainability Cell चे मूळ उद्दिष्ट हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा सर्वांगीण विकास करण्याकरिता मोलाचा ठरणार आहे.
• पर्यावरण संवर्धन हवा गुणवत्ता कृती (Environment Conservation and air quality action) वाहतुक, गतीशिलता अणि शहरी Landscape (Transport, Mobility and Urban Landscape),
• आपत्ती जोखीम आणि भेद्यता (Disaster risk and Vulnerabilities) पर्यायी उर्जा ( alterative energy), सामाजिक विकास (Social development) वित्त आणि नवकल्पना (Finance and Innovation) अशा सहा पायाभूत गरजांवर Sustainability Cell काम करणार आहे.
• भविष्याच्या गरजाशी तडजोड न करता आजच्या गरजा पूर्ण करून आपल्या नागरिकांना लाभदायक शाश्वत वाढ सुनिश्चित करण्यासाठी महानगरपालिकेला सर्व प्रकल्पांमध्ये Sustainability Cell मदत करणार आहे.
• सर्वांगीण उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आणि पिंपरी चिंचवडला सुरक्षित, Sustainable शहरांमध्ये बदलण्यासाठी सामाजिक, पर्यावरणीय आणि आर्थिक सुधारणा करण्याच्या अनुषंगाने पावले उचलण्यासाठी Sustainability Cell ची निर्मिती पिंपरी चिंचवड शहराच्या दृष्टिकोनातून खूप मोलाची ठरणार आहे.
क्रिडा
– पिंपरी चिंचवड शहरात वाकड येथे अत्याधुनिक ८ कोर्ट चे बॅडमिंटन स्टेडियम बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
– अश्वरोहकांना प्रशिक्षण देण्यासाठी इक्वेस्ट्रियन अकादमी सुरू करण्याचे नियोजित आहे, रायफल आणि पिस्तूल शूटिंग आणि धर्नुविद्या अकादमी पिंपरी चिंचवड शहरात सुरू करण्याचे नियोजित आहे.
– महानगरपालिकेच्या ६ जलतरण तलावाची निवड करून Revenue share model वर आधरित जलतरणतलाव सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर चालवण्यास देण्यात येणार आहे.
सार्वजनिक खाजगी भागीदारी / इतर वित्तीय स्रोतांमार्फत करावयावी कामे
• कर्ज रोख्याद्वारे (Municipal Bond) निधी उभारून पवना, इंद्रायणी व मुळा या नद्यांच्या पुनरूज्जीवन प्रकल्पाचे काम करणे.
• मोशी हॉस्पिटल,
• अण्णासाहेब मगर स्टेडियमचा १) क्लब हाऊस २) बहुउद्देशीय इनडोअर हॉल ३) स्पोर्ट्स अकादमी या तीन भागामध्ये विकास करण्याचे नियोजन आहे.
• पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात विविध ठिकाणी EV Charging Station उभारणी करणे.
• महानगरपालिका क्षेत्रातील विविध ठिकाणची उद्याने विकसित करणे. सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर 75 MLD टर्सरी ट्रिटमेंट प्लांट उभारण्यात येणार आहे.

• सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर विविध बी. आर. टी. रस्त्याचे सुशोभिकरण करण्याचे नियोजित आहे.
• पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आरक्षण क्रमांक १८९ ड विद्यमान विकास आराखड्यानुसार बिजनेस सेंटरसाठी आरक्षित आहे. त्यातील सर्व्हे नंबर २०३, २०४, २१३, २१४, २१५, २१६, २१९ (पैकी) मधील सुमारे 26 एकरच्या भूखंडावर सिटी सेंटर प्रकल्प विकसित करणार आहे. सिटी सेंटर प्रकल्पामध्ये हॉटेल, मॉल, ऑफिस, एंटरटेनमेंट सेंटर किंवा तत्सम प्रकारचे स्टक्चर विकसित केले जाणार आहेत. जेणेकरून शहराची ओळख राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविणे आणि नागरिकांना मध्यवर्ती सोयीसुविधांनी सज्ज सिटी सेंटर निर्माण करणेचा मानस आहे.

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani