लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

सर्वाधिक लोकसंख्येचा प्रभाग : तळवडे प्रभाग

लोकवार्ता : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची तीन सदस्यीय पद्धतीची अंतिम प्रभाग रचना आज (शुक्रवारी) महापालिका निवडणूक विभागाने प्रसिद्ध केली आहे. प्रभागाची किमान लोकसंख्या 32 हजार तर कमाल लोकसंख्या 40 हजार अशी आहे. अनुसूचित जातीसाठी 22 तर अनुसूचित जमातीसाठी 3 जागा राखीव आहेत. तसेच 114 जागा सर्वसाधारण गटासाठी आहेत. महापालिकेच्या नगरसेवक संख्येत 11 ने वाढत ती 139 झाली. या अंतिम प्रभाग रचनेकडे नगरसेवकांसह इच्छुक उमेदवार आणि नागरिकांमध्ये उत्सुकता होती. नवा प्रभाग कसा असेल? त्याला कोणता भाग जोडला असले? कोणता भाग वगळला असेल? याबाबत उत्सुकता आहे. राजकीय क्षेत्रासह सर्वत्रच अंतिम आराखड्याचीच चर्चा होती. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनुसूचित जातींसाठी 16 टक्के आरक्षण आहे. त्यामुळे 139 सदस्यांच्या महापालिका सभागृहात 22 सदस्य असतील. त्यात महिला व पुरुष सदस्यांची संख्या प्रत्येकी 11 असेल. लोकसंख्येनुसार 22 प्रभाग अनुसूचित जातींसाठी राखीव राहणार आहेत. कोणते प्रभाग आरक्षीत होतात, याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे. तर, अनुसूचित जमातीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तीन टक्के आरक्षण आहे. त्यानुसार सध्यस्थितीत अनुसूचित जमातीतील सदस्य संख्या तीनच राहणार आहे. त्यांच्यासाठी तीन प्रभाग आरक्षित असतील.

प्रभागाची किमान लोकसंख्या 32 हजार तर कमाल लोकसंख्या 40 हजार अशी आहे. सर्वात कमी लोकसंख्या प्रभाग 37 ची असून ती 32 हजार 664 अशी आहे. तर, सर्वाधिक लोकसंख्या तळवडे प्रभागाची असून ती 40 हजार 767 अशी आहे. चार सदस्यीय प्रभाग असलेल्या सांगवीतील लोकसंख्या 46 हजार 979 अशी आहे.

लोकसंख्या (2011) : 17 लाख 27 हजार 692
अनुसूचित जातीची लोकसंख्या : 2 लाख 73 हजार 810 (15.84टक्के)
अनुसूचित जातीसाठी आरक्षण 16 टक्के : एकूण 22 जागा (पैकी 11 महिला)
अनुसूचित जातीसाठी राखीव प्रभाग : 29, 19, 20, 22, 43, 11, 37, 18, 29, 34, 16, 35, 17, 44, 39, 32, 46, 41, 14, 25, 38, 33
अनुसूचित जमातीची लोकसंख्या : 36 हजार 535 (2.11 टक्के)
अनुसूचित जमातीसाठी आरक्षण 3 टक्के : 3 जागा (पैकी 2 महिला)
अनुसूचित जमातीसाठी राखीव प्रभाग : 41, 5 आणि 6
सर्वसाधारण प्रभाग : 114 (पैकी 57 महिला)
एकूण नगरसेवक संख्या : 139

प्रभाग क्रमांक एकूण लोकसंख्या अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती
1) 40767, 5338, 956
2) 32161, 5348, 956
3) 36718, 5763, 626
4) 39646, 4646, 1204
5) 34816, 4349, 1686
6) 40646, 5080, 2573
7) 42251, 4449, 1578
8) 39219, 4434, 665
9) 40018, 3489, 1135
10) 39802, 2796, 784
11) 38313, 8950, 637
12) 35910, 3933, 539
13) 39149, 4193, 544
14) 35711, 5813, 589
15) 35209, 1670, 223
16) 35424, 6950, 370
17) 34150, 6342, 668
18) 38244, 7999, 383
19) 33916, 11571, 297
20) 36588, 11462, 1007
21)40085, 2843, 279
22) 37768, 11495, 404
23) 36947, 2182, 330
24) 38779, 8023, 1521
25) 39531, 6375, 728
26) 39600, 3816, 467
27) 36547, 5384, 358
28) 39753, 2026, 281
29) 39036, 16508, 295
30) 38906, 3249, 368
31) 39068, 4453, 450
32) 33584, 5701, 340
33) 37591, 5908, 622
34) 34085, 6871, 441
35) 34957, 5668, 480
36) 36089, 4775, 575
37) 32664, 7209, 789
38) 34873, 5581, 586
39) 39652, 6742, 1005
40) 37920, 3219, 456
41) 34071, 5653, 2333
42) 36754, 3516, 661
43) 39266, 11134, 1551
44) 40032, 7011, 2018
45) 34527, 4085, 998
46) 46979, 7919, 1303
एकूण 17, 27, 692| 2, 73, 810, 36, 535

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani