महापालिकेकडून प्रभाग निहाय नकाशे संकेतस्थळावर प्रसिद्ध
लोकवार्ता : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची अंतिम प्रभागरचनेची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या शुक्रवारी अंतिम प्रभाग रचनेचे नकाशे महापालिकेच्या निवडणूक विभागाने संकेतस्थळावर आणि क्षेत्रीय कार्यालय स्तरावर प्रसिद्ध केले आहेत. त्यामुळे आता नागरिकांना प्रभागनिहाय रचनेचे नकाशे पाहायला मिळतील.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची अंतिम प्रभागरचनेची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या शूरकरावरी अंतिम प्रभाग रचनेचे नकाशे महापालिकेच्या निवडणूक विभागाने संकेतस्थळावर आणि क्षेत्रीय कार्यालय स्तरावर प्रसिद्ध केले आहेत. त्यामुळे आता नागरिकांना प्रभागनिहाय रचनेचे नकाशे पाहायला मिळतील.
सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचा आदेश दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोग कामाला लागले. १७ मे पर्यंत अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्याचे आदेश देण्यात आले होते. पण पिंपरी-चिंचवड महापालिकेने १३ मे रोजी प्रभाग रचना जाहीर केली.
आता महापालिकेकडून प्रभागनिहाय नकाशे पालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. महापालिका निवडणुकीसाठी नगरसेवकांची १३९ संख्या असून यामध्ये ४५ प्रभाग हे त्रिसदस्यीय, तर एक प्रभाग चार सदस्यीय आहे. अशी माहिती निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांनी दिली आहे.