पुणे-पिंपरी चिंचवड निवडणूक : महापालिकेत महिला आरक्षण जाहीर होणार
लोकवार्ता : पुणे पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला आरक्षण निश्चित होणार आहे. पुणे महापालिकेच्या ५८ प्रभागातील १७३ जागांसाठी तसेच पिंपरी चिंचवड शहराच्या ४६ प्रभागांची आरक्षण आज ११ नंतर जाहीर होणार आहे. ओबीसी आरक्षण वगळता अन्य आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे.

पुणे पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला आरक्षण निश्चित होणार आहे. पुणे महापालिकेच्या ५८ प्रभागातील १७३ जागांसाठी तसेच पिंपरी चिंचवड शहराच्या ४६ प्रभागांची आरक्षण आज ११ नंतर जाहीर होणार आहे. ओबीसी आरक्षण वगळता अन्य आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत ४६ प्रभाग असून नगरसेवकांची संख्या १३९ असणार आहे. १३९ पैकी ६९ पुरुष नगरसेवक तर ७० महिला नगरसेविका अशी वर्गवारी असेल. १३९ नागरसेवकांपैकी ३ जागा अनुसूचीत जमातींसाठी, तर २२ जागा अनुसूचित जातीसाठी राखीव असतील. ओबीसी आरक्षणाविना निवडणूक होण्याची शक्यता असल्याने ओबीसी प्रवर्गातून लढण्याची ३८ जागांची संधी गेली. त्यामुळे ११४ जागांवर खुल्या प्रवर्गातून निवडणूका होतील. सोडतीनंतर १ जूनला प्रभागाचे आरक्षण प्रसिद्ध केले जाईल.
पुणे महापालिकेतील १६५ नागरसेवकांपैकी किती नगरसेवकांना पुन्हा संधी मिळणार हे ही पहायला मिळेल. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आरक्षणाची सोडत काढली जाणार आहे. महापालिकेची एकूण सदस्यसंख्या १७३ आहे तर महिला आरक्षण असलेल्या महिलांची संख्या ८७ होणार आहे. ८७ मधून ५८ जागा या राखीव असल्याने २९ महिलांना लॉटरी पद्धतीने आरक्षण द्यावे लागेल. त्यामुळे अनेकांची धाकधूक वाढली आहे.