त्रिसदस्यीय प्रभाग रचनेद्वारे होणार निवडणुका ! अखेर अंतिम प्रभाग रचना जाहीर…
लोकवार्ता : त्रिसदस्यीय प्रभाग रचनेद्वारे निवडणुका होणार आहेत. अखेर अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. गुरुवारी (दि. १२) राज्य निवडणूक आयोगाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभाग रचनेच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी दिली असून अंतिम आराखडाही जाहीर केला आहे. प्रारूप रचनेत चार बदल करण्यात आले आहेत. ५ हजार ६८४ हरकती आणि सूचनांचा पाऊस पडल्यानंतर मोजके बदल करण्यात आले आहेत. हा अंतिम आराखडा महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. तसेच चऱ्होली, चिखली, प्रेमलोकपार्क, इंद्रायणीनगर या प्रभागात किरकोळ बदल करण्यात आले आहेत.

१ फेब्रुवारीला महापालिकेने त्रिसदस्यीय प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध केला. यामध्ये तीन सदस्यांचे ४५ आणि चार सदस्यांचे एक असे ऐकून ४६ प्रभाग आहेत. १३९ नगरसेवकांची संख्या असणार आहे. १४ फेब्रुवारीपर्यंत या आराखड्यावर हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या होत्या. ५ हजार ६८४ सूचना आणि हरकतींवर २५ फेब्रुवारी रोजी प्राधिकृत अधिकारी अनिल कवडे यांच्या समोर सुनावणी करण्यात आली. २ मार्चला अहवाल राज्य निवडणूक आयोगाला पाठवण्यात आला. मात्र ओबीसी आरक्षणामुळे राज्य सरकराने विधिमंडळात कायदा पारित करून प्रभाग रचनेचे सर्व अधिकार स्वतःकडे घेतले. या कायद्याच्या विरोधात १२ जणांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर निकाल देत न्यायालयाने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर अंतिम आराखडा आखण्यात आला. निवडणूक आयोगाचे आयुक्त यूपीएस मदान यांनी गुरुवारी स्वाक्षरी करून याला मंजुरी दिली. आयोगाची परवानगी मिळताच अखेर महापालिकेच्या निवडणूक विभागाने अंतिम आराखडा प्रसिद्ध केला.
प्रभाग क्रमांक २, १२, ३, ५, ११, ७, २६ आणि २७ मध्ये बदल करण्यात आले असून काही भाग जोडून शेजारच्या प्रभागाला जोडण्यात आले आहेत. त्यामुळे काही प्रभागांच्या लोकसंख्येमध्ये बदल झाला आहे. हा किरकोळ बदल करण्यात आला असून इतर कोणतेही बदल केलेले दिसत नाहीत. निवडणूक आयोगाने आज अंतिम आराखडा जाहीर केल्यामुळे लवकरच आरक्षणाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.