Pcmc लोकमत Achievers पुरस्कार सचिन भैया लांडगे यांना
लोकवार्ता : लोकमत समूहातर्फे दिला जाणारा यंदाचा Pcmc लोकमत Achievers पुरस्कार आमदार महेश लांडगे यांचे बंधू सचिन लांडगे यांना देण्यात आला आहे.

सामाजिक कार्यात सदैव तत्पर असणारे सचिन लांडगे याचे सायकल मित्रच्या माध्यमातून भारतातली सर्वांत मोठ्या रिव्हर सायक्लोथॉन चे नियोजन करण्यात आले होते. तसेच अविरत श्रमदान च्या माध्यमातून दत्तगड डोंगर, दिघी येथे 20,000 पेक्षा जास्त झाडांचे वृक्षारोपण व संवर्धन केले गेले. या सर्व कामाची दखल लोकमत समुहातर्फे घेतली गेली. आणि त्यांच्या या कार्यास मानाचा “Pcmc लोकमत Achievers” हा पुरस्कार विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते देण्यात आला.
याप्रसंगी लोकमतचे वरिष्ठ संपादक संजय आवटे, जेष्ठ पत्रकार हनुमंत पाटील आणि माजी नगरसेवक अजित गव्हाणे उपस्थित होते.