राजगुरूनगर येथील दाम्पत्याने वाढदिवसानिम्मित उचलला पुणे-नाशिक महामार्गावरील कचरा
लोकवार्ता : राजगुरू नगर मध्ये राहणाऱ्या एका पती-पत्नी दाम्पत्याने आज वाढदिवसानिम्मित पुणे-नाशिक महामार्गावरील जुन्या पुलाजवळ साचलेला कचरा स्वखर्चातून जेसीबी आणि ट्रेकटच्या साहाय्याने उचलून हा परिसर स्वच्छ केला. अशाप्रकारे वाढदिवस साजरा केल्याने आजूबाजूच्या लोकांनी त्यांचे कौतुक केले.

लोकवार्ता : राजगुरू नगर मध्ये राहणाऱ्या एका पती-पत्नी दाम्पत्याने आज वाढदिवसानिम्मित पुणे-नाशिक महामार्गावरील जुन्या पुलाजवळ साचलेला कचरा स्वखर्चातून जेसीबी आणि ट्रेकटच्या साहाय्याने उचलून हा परिसर स्वच्छ केला. अशाप्रकारे वाढदिवस साजरा केल्याने आजूबाजूच्या लोकांनी त्यांचे कौतुक केले. यातून त्यांनी स्वच्छतेचा सामाजिक संदेश दिला असून प्रत्येकाने आपल्या जबाबदारीने आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. राजगुरू नगर येथील संतोष उर्फ बापूशेठ मुरलीधर राक्षे आणि त्यांच्या पत्नी राणी राक्षे यांनी हा उपक्रम राबवला. हुतात्मा सोशल फाउंडेशचे अध्यक्ष कैलास दुधाने यांच्याकडून त्यांनी सल्ला घेतला. त्यांच्याशी चर्चा करून हा उपक्रम केल्याचे त्यांनी सांगितले.
कचऱ्यामुळे सर्व परिसरात दुर्गंधी होते. त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आपला परिसर स्वच्छ ठेवा, असं ते यावेळी म्हणाले. आपल्या परिसरात कचरा कुंडी ठेऊन त्यात कचरा टाका असा संदेश यावेळी त्यांनी दिला. प्रत्येक नागरिकाने आपल्या जबाबदारीचे भान ठेवून स्वच्छता केली तर रोगराईला आळा बसेल असं ते म्हणाले.