पिंपरी चिंचवड पत्रकार संघच्या अध्यक्ष पदी प्रविण शिर्के तर कार्याध्यक्ष पदी अविनाश आदक; पिंपरी चिंचवड डिजिटल मिडिया अध्यक्ष पदी प्रशांत साळुंखे तर कार्याध्यक्ष पदी राजू वारभुवन
पिंपरी :- मराठी पत्रकार संघ मुंबई सलग्न पिंपरी चिंचवड पत्रकार संघ व पिंपरी चिंचवड डिजिटल मिडियाची द्विवार्षिक निवडणूक मार्च 2023 ते मार्च 2025 प्रक्रिया शनिवार दि.25/ 3 /2023 रोजी भा. वी. कांबळे पत्रकार कक्ष तिसरा मजला महापालिका भवन पिंपरी18 येथे पूर्ण झाली.

पिंपरी चिंचवड पत्रकार संघच्या अध्यक्षपदी- प्रविण शिर्के याची बिनविरोध निवड झाली. तर कार्याध्यक्षपदी- अविनाश आदक हे 35 मते पडून निवडून आले. तसेच उपाध्यक्षपदी- माधुरी कोराड, गणेश मोरे, सरचिटणीसपदी- रोहित खगेँ, खजिनदारपदी- राम बनसोडे, कार्यकारीणी सदस्यपदी- तुळशीदास शिंदे, संतोष जाधव, सिताराम मोरे, प्रकाश जमाले याची बिनविरोध निवड झाली.
पिंपरी चिंचवड डिजिटल मिडिया अध्यक्ष पदी प्रशांत साळुंखे हे 51 मते घेऊन विजयी झाले तर कार्याध्यक्ष पदी राजू वारभुवन याची बिनविरोध निवड झाली.
निवडणूक निर्णय अधिकारी-बाळासाहेब ढसाळ, सहाय्यक-विशाल जाधव होते. यावेळी विभागीय सचिव नाना कांबळे, अनिल वडघुले, मारूती बाणेवार, अनिल भालेराव आदी. उपस्थित होते.