PCMC NEWS : गोधड्यांनी रंगला इंद्रायणी घाट
लोकवार्ता : आळंदी येथील इंद्रायणी नदी घाटावर सकाळपासून स्थानिक नागरिकांसह जवळपासच्या गावाच्या परिसरातील नागरिकांनी घरातील अंथरूण-पांघरूणासाठी वापर करण्यात येणाऱ्या गोधडया, ब्लॅंकेट, चादर धुण्यासाठी इंद्रायणी नदी घाटावर मोठी गर्दी केली होती. नदी घाटावर वाळत टाकलेल्या विविध रंगाच्या गोधड्या आणि ब्लॅंकेटने येथील परिसर फुलून गेला होता.

पितृ पंधरवड्याच्या दरम्यान नवरात्र पूर्वी (Indrayani Ghat) घरातील अंथरूण-पांघरूण धुतली जातात. नवरात्र निमित्ताने घटरूपाने घरी देव येतात. नवरात्र सुरु होतो. दसरा आणि त्या पुढे काही दिवसांनी दिवाळी असते. त्यापूर्वी घराची स्वच्छता करण्याची पद्धत आहे.