लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपुष्टात ; महापालिकेचा कारभार प्रशासनाच्या हाती

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. त्यामुळे सध्या महापालिकेचा कारभार प्रशासनाच्या हाती आहे. महापालिकेतील क्रीडा आणि वैद्यकीय विभागातील अधिकान्यांनी भुवनेश्वर, दिल्लीतील पाहणी दौ-यावर दोन लाख रुपये उडविले आहेत. त्यामुळे प्रशासक राजवटीतही लोकप्रतिनिधीचाच कित्ता गिरवला जात आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात दाट लोकवस्तीच्या भागात साधारणत आठ हजार ते दहा हजार वस्ती असलेला भाग, झोपडपट्टी भाग, जास्त मनुष्यवस्ती, पाली अशा ठिकाणी एक किलोमीटरच्या अंतरात ज्या ठिकाणी महापालिकेचे रुग्णालय, दवाखाने उपलब्ध नाहीत, अशा ठिकाणी दिल्ली शहरातील मोहल्ला क्लिनिकच्या धर्तीवर जिजाऊ क्लिनिक सुरू करण्यात येणार आहे या क्लिनिकसाठी महापालिकेच्या मालमत्ता, खासगी मालमत्ता या भाडेतत्त्वावर घेऊन अथवा कटेनरद्वारे सेवा उपलब्बा करून घेण्याचे प्रस्तावित आहे.

तळेगाव-दाभाडे येथील कपला हॉलीडेज या एजन्सीमार्फत या अधिकाऱ्यांनी पुणे ते दिल्ली, दिल्ली अंतर्गत मोटार प्रवास आणि दिल्ली पुणे विमान प्रवास असा दौरा केला. या दौन्यासाठी 70 हजार 477 रुपये या एजन्सीला देण्यात येणार आहेत. वैद्यकीय विभागाच्या सन 2022-23 घ्या अंदाजपत्रकातील प्रवास भत्ता या लेखाशीर्षातून हा खर्च करण्यात येणार आहे. भुवनेश्वर व विशाखापट्टणम येथे हॉकी खेळासाठी विश्व स्तरावरच्या सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.

या धर्तीवर हॉकी खेळासाठी दर्जेदार सुविधा पिंपरी चिंचवड शहरात निर्माण करण्यासाठी महापालिकेतील क्रीडा विभागाच्या अधिकारी तीन दिवसांचा भुवनेश्वर पाहणी दौरा काढला 3 ते 5 एप्रिलपर्यंतच्या या दौऱ्यात महापालिका क्रीडा विभागाचे सहायक आयुक्त, क्रीडा स्थापत्य विभागाचे सहशहर अभियंता. ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाचे क्रीडा पर्यवेक्षक आदी सहभागी झाले होते. या दीन्यांसाठी विमान प्रवास, जाणे-येणे, हॉटेल निवास, भोजन, नाश्ता व्यवस्था आणि स्थानिक प्रवासासाठी एकूण 1 लाख 34 हजार रुपये खर्च आला.

हा उपक्रम सुरू करण्यासाठी महापालिका वैद्यकीय विभागातील अधिकान्यांनी 4 ते मे या कालावधीत दौरा काढला. या दौ-यात महापालिकेचे सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डी. लक्ष्मण गोफणे, वायसीएम रुग्णालय पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे सहायक प्राध्यापक डॉ. अतुल देसले, स्थापत्य मुख्य कार्यालयाचे कार्यकारी अभियंता प्रमोद ओंबासे, अनुप पानसे आणि श्रीती मित्रा हे सहभागी झाले होते.

इमारत दुरुस्तीसाठी मालकांना महापालिकेची परवानगी घेणे आवश्यक; पावसाळ्यातील धोका टाळण्यासाठी देण्यात आल्या सूचना

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani