बहुसदस्सीय प्रभाग पद्धतीविरोधात याचिका
बहुसदस्यीय वॉर्ड पद्धतीबाबत म्हणणे सादर करा – उच्च न्यायालयाचे आदेश
पिंपरी।लोकवार्ता-
महापालिका निवडणुकांसाठी बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीला विरोध करणाऱ्या याचिकांची दखल घेऊन न्यायमूर्ती ए ए सय्यद व न्यायमूर्ती एस जी दिघे यांनी राज्य निवडणूक आयुक्त तसेच महाराष्ट्र राज्य सरकार आज दिनांक 16 रोजी नोटीस जारी केल्या आहेत.
पुण्यातील परिवर्तन संस्थेचे तन्मय कानिटकर आणि पिंपरी चिंचवडचे माजी नगरसेवक मारुती भापकर यांच्या वतीने अॅड. असीम सरोदे यांनी दोन याचिका हायकोर्टात दाखल केल्या आहेत. दोन आठवड्यात म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

मारुती भापकर यांच्या याचिकेत 74व्या घटनादुरुस्तीनुसार एरिया सभा घेण्याचे नियम आधी तयार करा आणि तोपर्यंत बहुसदस्यीय पद्धतीला स्थगिती दया अशी मागणी करण्यात आली आहे.
परिवर्तन आणि मारुती भापकर यांच्या याचिकेत अॅड. असीम सरोदे यांच्यासह .अॅड.अजित देशपांडे, .अॅड.अक्षय देसाई, अॅड. मदन कुऱ्हे , अॅड. तृणाल टोनपे व अॅड. अजिंक्य उडाणे काम पाहत आहे.