अनधिकृत होल्डींगला लागेबंध कोणाचे?
लोकवार्ता : अनधिकृत होल्डींगला लागेबंध कोणाचे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पिंपरी चिंचवड शहराच्या अनेक ठिकाणी अनधिकृत पत्राशेडवर धडक कारवाई करण्यात आली आहे. स्वच्छ शहर बनवण्याचा अजेंडा हाती घेत आयुक्त राजेश पाटील यांनी अनधिकृत पत्राशेडवर बुलडोझर चालवले आहे. त्यामुळे अनेकांचे संसार रस्त्यावर आले आहेत. कालपासून पुणे नाशिक महामार्गावरील पत्राशेड काढण्यात येत आहेत. रस्ता रुंदीकरण आणि अनधिकृत पत्राशेडचे कारण सांगत पोलीस बंदोबस्तात अनेक ठिकाणी कारवाई झाली.

पिंपरी चिंचवड शहराच्या अनेक ठिकाणी अनधिकृत पत्राशेडवर धडक कारवाई करण्यात आली आहे. स्वच्छ शहर बनवण्याचा अजेंडा हाती घेत आयुक्त राजेश पाटील यांनी अनधिकृत पत्राशेडवर बुलडोझर चालवले आहे. त्यामुळे अनेकांचे संसार रस्त्यावर आले आहेत. कालपासून पुणे नाशिक महामार्गावरील पत्राशेड काढण्यात येत आहेत. रस्ता रुंदीकरण आणि अनधिकृत पत्राशेडचे कारण सांगत पोलीस बंदोबस्तात अनेक ठिकाणी कारवाई झाली.
परंतु मोशी, चऱ्होली, चिखली, भोसरी या ठिकाणी शहरभर भर चौकात अनधिकृत फ्लेक्स मोठ्या दिमाखात उभे आहेत. पुणे- नाशिक महामार्ग, देहू आळंदी रोड, भोसरी चौक, मोशी चौक, चिखली चौक, पिंपरी या भागात टोलेजंग उभारलेले होल्डिंग अद्यापही तसेच आहेत. त्यावर कारवाई करण्याकडे का दुर्लक्ष केलं जातंय? हा प्रश्न उपस्थित होत आहे. यापूर्वी महानगरपालिकेत होल्डिंग बाबत अनेक घटना घडल्या आहेत. असे असतानाही प्रशासन गप्प आहे. त्यामुळे होल्डिंग धारकांना कोणाचे लागेबंध तर नाहीत ना? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.