लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

“क्रीडा नगरी म्हणून पिंपरी चिंचवडची ओळख व्हावी”

औद्योगिकनगरी बरोबरच क्रीडानगरी म्हणून देशात पिंपरी-चिंचवड शहराची ओळख निर्माण करायची आहे. त्यामुळे क्रीडा क्षेत्रासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे क्रीडा समितीचे सभापती प्रा. उत्तम केंदळे यांनी सांगितले.

पिंपरी। लोकवार्ता-

आमदार महेश लांडगे यांच्या सूचनेनुसार शहरातील विविध क्रीडा संघटनांची बैठक नुकतीच महापालिकेत झाली. क्रीडा समिती सदस्या शर्मिला बाबर, क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरे, जुनि टेक्नि, असि. गजेंद्र नागपुरे, क्रीडा पर्यवेक्षक अनिता केदारी, जयश्री साळवे, रंगराव कारडे, महाकाळ आत्माराम, विश्वास गैंगजे, दत्तात्रय झिजुर्डे, अॅथलेटिक्स संघटनेचे रामदास कुदळे, शेखर कुदळे, कराटे संघटनेचे खजिनदार अविनाश चंदनशिवे उपस्थित होते.

तसेच, कराटे संघटनेचे शहराध्यक्ष रवींद्र सूर्यवंशी, योग संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनोज काळे, बॉक्सिंग संघटनेचे प्रकाश काकडे, मनोहर इंगवले, डिटट्रीक बॅडमिंटन संघटनेचे सोनाजी गावडे, राजीव बाग, इकबाल शेख, किक बॉक्सिंग असोसिएशनचे संतोष म्हात्रे, आर्चरी असोसिएशन शहर सचिव सोनल बुदेले आदी उपस्थित होते.

बॉक्सिंगसाठी शहरात अपुरे मैदाने आहेत. त्या ठिकाणी अजून सुविधा वाढवाव्यात.राष्ट्रीय स्तरावरची स्पर्धा घ्यावी. बॉक्सिंगसाठी रिंग तयार करावी. यावर बोलताना सभापती केंदळे म्हणाले, आयुक्त राजेश पाटील हे स्वतः एक खेळाडू असल्यामुळे याकडे ते लक्ष देतील. त्यामुळे या सर्व समस्या दूर होतील.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani