लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

पिंपळे निलख – विशालनगर भागतील कृत्रिम पाणी टंचाई विरोधात भव्य मोर्चा

-नगरसेवक तुषार कामठे कृत्रिम पाणीटंचाई विरोधात आक्रमक.

पिंपरी । लोकवार्ता
पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक गेल्या कित्तेक दिवसांपासून पाणी टंचाईला सामोरे जात आहे. येथील नागरिकांना पावसाळ्याच्या तोंडावर पाणीटंचाई ला सामोरे जावे लागत आहे. नागरिकांनी कित्तेक वेळा महापालिकेला पत्र पाठवून देखील यावर तोडगा निघाला नाही. यामुळे शहरातील नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.याचे निराकरण करण्यासाठी आणि पिंपरी चिंचवड करांना त्यांचा हक्क आणि न्याय मिळवून देण्यासाठी पिंपळे निलख – विशालनगर भागातील कृत्रिम पाणी टंचाई विरोधात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर माजी नगरसेवक तुषार कामठे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य हंडा मोर्चा काढण्यात येणार आहे.

हा भव्य हंडा मोर्चा मंगळवार दि. 28 जून 2022 रोजी स.11.00 वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते मनपा भवन येथे धडकणार आहे. पिंपळे निळख विशालनगर भागात गेल्या 4 महिन्यापासून कृत्रिम पाणीटंचाई केली जात असल्याचा आरोप कामठे यांनी केला आहे तसेच गेल्या पाच दिवसात एक थेंब पाणी सुद्धा नागरिकांना मिळत नसेल तर ही शोकांतिका आहे असेही कामठे यांनी म्हटले आहे, पिंपरी चिंचवड करांच्या पाणी प्रश्नाचे निराकरण करण्यासाठी माता भगिनींनी हांडे घेऊन या मोर्चा मध्ये जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती तुषार कामठे यांनी केली आहे.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani