लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

पिंपरी विधानसभा मतदार संघ सत्ताधारी भाजपाचे ‘टार्गेट’

‘एक बूथ ३० यूथ’ उपक्रमाच्या माध्यमातून मोर्चेबांधणी; भाजपाच्या दोन्ही आमदारांच्या उपस्थितीत मॅरेथॉन बैठक

लोकवार्ता । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे ‘टार्गेट’ पिंपरी विधानसभा मतदार संघ राहणार आहे. या मतदार संघात भाजपाचा आमदार नाही. पण, शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे आणि माजी शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप दोघांनीही या पिंपरीत लक्ष घातले आहे.

सत्ताधारी भाजपाने मतदार संघ निहाय सक्षम बूथ अभियान सुरू केले. चिंचवड आणि भोसरी मतदार संघातील बूथ बांधणीचे काम प्रगतीपथावर आहे. त्यासोबतच आता पिंपरी विधानसभा मतदार संघात ‘एक बूथ ३० युथ’ हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यानिमित्ताने भाजपा पदाधिकाऱ्यांची मॅरेथॉन बैठक झाली.

यावेळी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, माजी शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशीव खाडे, संघटन सरचिटणीस व मुख्य प्रवक्ता अमोल थोरात, सरचिटणीस राजू दुर्गे, बाबू नायर, महिला शहराध्यक्ष उज्ज्वला गावडे, मंडलाध्यक्ष विजय शिनकर, महेंद्र बाविसकर यांच्यासह सर्व नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार लांडगे आणि जगताप यांनी बूथ यंत्रणेसाठी लोक कसे जोडायचे? सुमारे ३० ते ३५ हजार लोकांच्या प्रभागामध्ये पक्षाने केलेली विकासकामे कशी पोचवायची? प्रत्येक हजार लोकांमागे ३० कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण कसे करायचे? याबाबत मार्गदर्शन केले. तसेच, पिंपरी मतदार संघातील भाजपाची कामगिरी आगामी निवडणुकीत निर्णायक ठरेल, असा विश्वासही दोन्ही आमदारांनी व्यक्त केला आहे.

पिंपरीत भाजपाची ताकद वाढणार
अमोल थोरात पिंपरी मतदार संघातील लोकांसाठी भाजपाचे 2 आमदार आहेत. दोघांनी एकत्रित लक्ष घातल्यामुळे भाजपाची ताकद वाढणार आहे. पिंपरीतून जास्तीत-जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. यापुढील काळात प्रभागस्तरावर बैठका घेण्यात येणार आहेत.

कामकाजाचे सुयोग्य नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार आणि विद्यमान नगरसेवकांसह कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, अशी माहिती मुख्य प्रवक्ते अमोल थोरात यांनी दिली.

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani