लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

पिंपरी-चिंचवड पोटनिवडणूक जाहीर; 7 फेब्रुवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत

लोकवार्ता : चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि पुण्यातील कसब्याच्या भाजप आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाल्यामुळे रिक्त झालेलया जागी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. 7 फेब्रुवारीला अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. तर, 27 फेब्रुवारीला मतदान आणि 2 मार्चला मतमोजणी असणार आहे. या निवडणुकीत भाजपची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. या निवडणूकीसाठीची अधिसूचना 1 जानेवारी रोजी जारी करण्यात येणार आहे. 7 फेब्रुवारी अर्ज दाखल करण्याची दोवटची तारीख असणार आहे.

पोटनिवडणूक

भाजप आमदार मुक्ता टिळक यांचे 22 डिसेंबर 2022 रोजी दिर्घ आजाराने निधन झाले होते. चिंचवडचे भाजप आमदार 9 लक्ष्मण जगताप यांचे उ जानेवारी 2023 रोजी कर्करोगाने निधन झाले होते. त्यामुळे कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघ या दोन्ही जागांसाठी पोटनिवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे.

8 फेब्रुवारी अर्जांची छाननी तर 10 फेब्रुवारी पर्यंत अर्ज परत घेता येणार आहेत. या दोन्ही पोटनिवडणूकांसाठी मतदान 27 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या निवडणूकीचा निकाल 2 मार्च रोजी जाहीर होईल.

या निवडणुकीत भाजपची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. भाजप विरोधात दोन्ही जागांवर महाविकास आघाडी उमेदवार देण्याची शक्यता आहे. दोन्ही जागेवर भाजपकडून कुणाला उमेदवारी मिळणार याकडे आता लक्ष लागले आहे.

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani