लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेसच्या वतीने ज्येष्ठ नागरीकांचा सन्मान सोहळा

-देशाच्या विकासात कॉंग्रेसची विचारधारा जोपासणा-या ज्येष्ठांचे योगदान-डॉ. विश्वजीत कदम

-कॉंग्रेसच्या सर्व आजी – माजी पदाधिका-यांना बरोबर घेऊन निवडणूका लढवणार-डॉ. कैलास कदम

पिंपरी। लोकवार्ता-

स्वातंत्र्यापुर्वीचा भारत आणि एकवीसाव्या शतकातील विकसित भारत या कालखंडात देशाच्या झालेल्या विकासात कॉंग्रेसची विचारधारा जोपासणा-या ज्येष्ठ नागरिकांचे महत्वपूर्ण योगदान आहे. गावखेडं ते पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी मेट्रो सिटी होण्यामध्ये ज्येष्ठांचा सहभाग आहे. अखिल भारतीय कॉंग्रेसच्या अध्यक्षा खासदार सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त या ज्येष्ठ नागरिकांचा पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसने आयोजित केलेल्या कार्यक्रमात उचित सन्मान करणे माझ्यासाठी गौरवशाली आहे. या ज्येष्ठ नागरिकांना बरोबर घेऊन पक्ष संघटना वाढवून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत पुन्हा कॉंग्रेसचा तिरंगा फडकवण्याचे ध्येय सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांचे आहे. या महापालिकेत पुन्हा कॉंग्रेसची सत्ता आली तर शहर टॅंकर मुक्त करु आणि सर्वांना चोविसतास पाणी पुरवठा करु असे प्रतिपादन सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी केले.

पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी खराळवाडी पिंपरी येथे गुरुवारी (दि. 9 डिसेंबर) कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा खा. सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा आणि स्वेटर, कानटोपी वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सचिव पृथ्वीराज साठे, महाराष्ट्र प्रदेश पर्यावरण सेलचे अध्यक्ष अशोक मोरे, माजी महापौर कविचंद भाट, शहर युवक अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, ज्येष्ठ नेत्या निगार बारसकर, शामला सोनवणे, एनएसयुआयचे प्रदेश अध्यक्ष अमिर शेख, माजी नगरसेविका निर्मला कदम, माजी नगरसेवक सद्‌गुरु कदम, विश्वास गजरमल, ज्येष्ठ कामगार नेते मनोहर गडेकर, एनएसयूआयचे शहराध्यक्ष डॉ. वसीम इनामदार, सेवा दल शहराध्यक्ष विरेंद्र गायकवाड, शिक्षण मंडळाचे माजी सभापती अभिमन्यू दहितुले, ज्येष्ठ नागरिक सेलचे माजी अध्यक्ष लक्ष्मण रुपनर, ज्येष्ठ नागरीक महासंघाचे अध्यक्ष अरुण बागडे तसेच प्रभाकर कोळी, फाळके दादा, माधव अडसुळे, चंद्रशेखर हुन्शाळ, आनंदराव फडतरे, शबीर इनामदार, राजू बंदपट्टे, राजाभाऊ कलापुरे, हज्जूभाई शेख, आयुबभाई कुरेशी, सुधीर पारकर, ओंकार भोकरे, नवनाथ विटेकर, संभाजी मुळीक, इरफान शेख, याकूब इनामदार, महिला नेत्या छायाताई देसले, प्रतिभा कांबळे, नंदाताई तुळसे, शोभा पगारे, सायली नढे, मल्याळी समाज नेते के. एम. रॉय, के. हरी नारायणन, बाबा बनसोडे, विजय ओव्हाळ, हिराचंद जाधव, उमेश बनसोडे, ज्ञानेश्वर मलशेट्टी, आबा खराडे, सतिश भोसले, किरण नढे, इस्माईल संगम, बसवराज शेट्टी, नयन पालांडे, रवी नांगरे, विश्वनाथ जगताप आदी उपस्थित होते.

स्वागत, प्रास्ताविक करताना पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम म्हणाले की, देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी शहरातील पहिल्या हिंदुस्थान एन्टीबायोटिक्स या कारखान्याची पायाभरणी केली. स्व. खा. आण्णासाहेब मगर, स्व. माजी मंत्री प्रा. रामकृष्ण मोरे यांनी पिंपरी चिंचवड शहर कामगार नगरीचा नावलौकिक जगभर पोहचविला. त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळेच येथे लाखो लोकांना रोजगार निर्माण झाला आहे. या शहराची ओळख आता उद्योग नगरी, कामगार नगरी, क्रीडा नगरी म्हणून झाली आहे. याचे ज्येष्ठ नागरीक साक्षीदार आहेत. पिंपरी चिंचवड शहराला पुन्हा गौरवशाली परंपरा मिळवून देण्यासाठी आणि महानगरपालिकेवर कॉंग्रेसचा झेंडा फडकविण्यासाठी कॉंग्रेसच्या सर्व आजी – माजी, युवक, ज्येष्ठ, महिला कार्यकर्त्यांना व पदाधिका-यांना बरोबर घेऊन आगामी निवडणूका लढविणार आहोत असेही डॉ. कैलास कदम म्हणाले.

पृथ्वीराज साठे म्हणाले की, जी युवा पिढी देशाचा इतिहास विसरते त्या देशाचा विनाश लवकर होतो. भारत देशाचा जाज्वल्य इतिहास पुन्हा युवा पिढीला सांगण्यासाठी या ज्येष्ठ नागरीकांच्या अनुभवाची शिदोरी उपयोगाची आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली कॉंग्रेसची वाटचाल सुरु आहे. मधल्या काळात शहर कॉंग्रेसकडे वरिष्ठ कॉंग्रेस नेत्यांनी दुर्लक्ष केले परंतू आता डॉ. विश्वजीत कदमांसारखा युवा राज्यमंत्री या शहरात पक्ष बांधणीकडे लक्ष देणार आहे. ज्येष्ठ आणि युवा यांचा समन्वयक साधत पुन्हा महापालिकेत कॉंग्रेस सत्ता काबीज करेल असा आत्मविश्वास आहे असेही पृथ्वीराज साठे म्हणाले. सुत्रसंचालन संभाजी मुळीक आणि आभार नरेंद्र बनसोडे यांनी मानले.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani