पिंपरी चिंचवड शहर शिवसेनेचे आंदोलन “फसले!”
किरीट सोमय्या यांनी शिवसेनेच्या निवेदनाकडे “ढुंकूनही” पाहिले नाही.
पिंपरी।लोकवार्ता-
पिंपरी चिंचवड शहरातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी भ्रष्टाचार करीत असून त्यांची ईडी मार्फत चौकशी करण्याची शिफारस करावी अशा मागणीचे निवेदन किरीट सोमय्यांना देणाऱ्या शिवसेना पक्षाने केलेले आंदोलन फसले असून त्याची शहरात चर्चा सुरू आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारची भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस करणारे भाजपचे नेते किरीट सोमय्या हे काल पिंपरी चिंचवड दौऱ्यावर होते.यावेळी पिंपरी चिंचवड शहरातील सत्ताधारी भाजपच्या भ्रष्ट कारभाराची चौकशीची शिफारस ईडीकडे करावी अशा मागणीचे निवेदन पिंपरी चिंचवड शहर शिवसेनेच्या वतीने किरीट सोमय्या यांच्यासाठी बनविण्यात आले मात्र किरीट सोमय्या यांनी शिवसेनेच्या निवेदनाकडे “डुंकूनही” पाहिले नाही. निवेदन न घेताच किरीट सोमय्या हे निघून गेले.

शिवसेनेने तयार केलेले मागणीचे निवेदन न स्वीकारल्याने शिवसेनेच्या वतीने निषेध म्हणून काळे झेंडे दाखवून आंदोलन करण्यात आले.मात्र आंदोलनामधील शिवसैनिकांच्या अल्प प्रतिसादामुळे व भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या आंदोलनास घोषणा देऊन जशास तसे उत्तर दिल्याने शिवसेनेच्या वतीने केलेले आंदोलन फसले असल्याचे बोलले जात आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुका काही दिवसावर आल्या आहेत तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असताना शिवसेना पक्षाची पिंपरी चिंचवड शहरात भाजपने केलेली ही अवस्था येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीसाठी चांगली नाही अशी चर्चा शहरात सुरू आहे.