पिंपरी चिंचवड पुन्हा अंधारात! नागरिकांचा संताप…
-पिंपरी चिंचवड येथे पुन्हा एकदा लोडशेडिंग होण्याची शक्यता.
पिंपरी । लोकवार्ता-
वाढत्या उष्णतेच्या तापमानामुळे आधीच नागरिक त्रासलेले असताना पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना “लोडशेडिंग’चा पुन्हा एकदा फटका बसण्याची शक्यता आहे. भोसरी परिसरात सहा ते आठ तास अघोषित भारनियमन करण्यात येत असून, स्थानिक नागरिक, व्यावसायिक आणि उद्योजक हैराण झाले आहे. महापालिकावितरण प्रशासनाकडून पुढील आठवड्यात भारनियमन घोषित करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत.या आधीच नागरीक लोडशेडिंग ला त्रासले असून पुन्हा एकदा लोडशेडिंग होण्याचे महावितरणने दिले आहेत.

भोसरी, एमआयडीसी, चिखली, कुदळवाडी आदी भागात गेल्या आठ दिवसांपासून वीज समस्या मोठ्याप्रमाणात वाढली आहे. विद्यार्थी, गृहणींना ऐन उकाड्याच्या दिवसांत वीजपुरवठा बंद झाल्यामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि महावितरण प्रशासनाविरोधात नागरिकांचा रोष वाढताना दिसत आहे. पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे म्हणाले की, राज्य सरकारने भारनियमनाबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. पण, यामुळे उद्योजक व नागरिकांना नाहक मनःस्ताप सहन करावा लागणार आहे. वीज पुरवठा बंद झाला, तर कामगारांचे पगार द्यावेच लागतात. तसेच, उत्पादन वेळेत नाही, तर ग्राहकांचीही नाराजी ओढावून घ्यावी लागते. शहरात वीजेचा पुरवठा मुबलक आहे. कोठेही भारनियमन करण्यात येत नाही, असा दावा महावितरण प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षात काही अनेक भागांत वीज पुरवठा खंडित होत आहे.आता यावर राजकीय नेते काय भूमिका घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.