“पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली”
पिंपरी। लोकवार्ता-
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. महानगरपालिकेच्या वतीने उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले आणि सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी शहर सुधारणा समिती सभापती अनुराधा गोरखे, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, स्वीकृत नगरसदस्य अॅड. मोरेश्वर शेडगे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक तसेच सामाजिक कार्यकर्ते दिलीप चौधरी, अनिल राऊत, शेखर लगड राठोड, योगेश गोमासे, धिरज झापर्डे, प्रविण खोडे, कार्तिक खोडे, गणेश अंबिके, डॉ. सरोजा अंबिके, निलांगी राऊत, विठ्ठल सायकर, प्रदीप सायकर, सुनिल गासे, सतिश घाटे, सचिन बारमुख, सिध्दार्थ शेलार उपस्थित होते.