पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक विभागातर्फे प्रभागनिहाय मतदारयादी तयार करण्याचे काम सुरु
आराखड्यानुसार आता प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेस दिले आहेत.
पिंपरी । लोकवार्ता-
पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक विभागातर्फे प्रभागनिहाय मतदारयादी तयार करण्याचे काम सुरु झाले आहे. शहरात एकूण 14 लाख 41 हजार 55 मतदार आहेत. त्यात पुरुष मतदार 7 लाख 74 हजार 338, महिला मतदार 6 लाख 66 हजार 647 आणि तृतीयपंथीय 70 मतदार आहेत. सर्वाधिक 5 लाख 64 हजार 994 मतदार चिंचवड विधानसभेत आहेत. तर स्थलांतरित, दुबार, मृत, बोगस अशा 5 हजार मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा यावर्षीच्या जानेवारी-फेब्रुवारीत प्रसिद्ध झाला जाहीर करण्यात आलेल्या आराखड्यानुसार आता प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेस दिले आहेत..

महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या आराखड्यामध्ये असलेल्या सूचना व हरकती नोंदवण्यासाठी नागरिकांना व राजकीय पक्षांना मुदत देण्यात आली आहे. त्यानुसार ते आपल्या हरकती महानगरपालिकेच्या कार्यालयात जमा करू शकतात. प्रभाग रचनेचा अंतिम आराखडा प्रसिद्ध झाल्यानंतर हद्दीतील बदलानुसार मतदार यादीच्या विभाजनामध्ये योग्य त्या दुरुस्त्या केल्या जाणार आहेत. याद्या बनविण्याचे काम संगणकाद्वारे केले जाणार आहे.