पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन
-प्रबोधन पर्वाचे उदघाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार .
पिंपरी । लोकवार्ता-
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा जोतिराव फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन दि.११/४/२०२२ पासून १५/०४/२०२२ पर्यंत केले जाणार आहे.या प्रबोधन पर्वाचे उदघाटन पुण्याचे पालक मंत्री तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे.
या चार दिवसांमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाची रूपरेखा
बेरोजगार युवक युवतींसाठी स्वयंरोजगार व उद्योजकता प्रशिक्षण शिबीर तसेच तरुण वर्गासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबतच
१३ एप्रिल २०२२ रोजी समता सायकल रॅली द्वारे महापुरुषांचा प्रचार पसार करण्यात येणार आहे. १४ एप्रिल रोजी सव भागांमध्ये कचरा संकलन करण्यासाठीप्लेगेथॉन मोहीम राबवून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाच्या उदघाटनासाठी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे तसेच श्रीरंग बारणे, अमोल कोल्हे, लक्ष्मण जगताप, महेश लांडगे आणि सहकारी मान्यवर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.