लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

पिंपरी चिंचवड महापालिकेचा पाणी पुरवठा विभागावर सल्लागार नेमण्याचा निर्णय

-पाणी पुरवठ्याची समस्या दूर करण्यासाठी घेतला निर्णय.

पिंपरी | लोकवार्ता-

पिंपरी चिंचवड येथे मागील आठवड्यापासून पाण्याच्या मोठी समस्या निर्मण झाली आहे. शहराच्या अनेक भागात पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. नागरिकांच्या समस्या लक्षात घेत महापालिकेने पाणी पुरवठा विभागावर सल्लागार नेमण्याचा निर्णय घेतला आहे. पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता प्रवीण लडकत फेब्रुवारी महिन्यामध्ये सेवानिवृत्त झाले. त्यानंतर विभागाचा अतिरिक्त कारभार बीआरटीएस विभागाचे सहशहर अभियंता श्रीकांत सवणे यांच्याकडे दिला आहे. आता पुन्हा या विभागासाठीच लडकत यांनाच सल्लागार नेमण्याचा घाट महापालिका प्रशासनाने घातला आहे.
शहरातील अनेक भागामधून पाण्याच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत आहेत.

अनेक ठिकाणी पाइपलाइन फुटणे, लिकेज असणे. याबाबत प्रशासनाकडे मोठ्या प्रमाणावर तक्रारी येण्यास सुरुवात झाली आहे. प्रशासकांनी पालिकेचा कारभार हाती घेतल्यानंतर झालेल्या जनसंवाद सभांमध्ये देखील पाणी प्रश्‍नावर सर्वाधिक तक्रारी आल्या होत्या. दरम्यान, शहराला दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी पवना बंद जलवाहिनी प्रकल्प, भामा-आसखेड पाणीपुरवठा योजना व आंद्रा धरणातून देखील पाणी घेऊन शहराला पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. मात्र हे प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने हाती घेतलेल्या या प्रकल्पांना यापूर्वीच सल्लागारांची नियुक्ती केली आहे. त्यांच्यावर महापालिकेचे करोडो रुपये खर्च होत आहेत. असे असतानाही आता पुन्हा विभागासाठीच निवृत अधिकारी सल्लागार म्हणून नेमण्याची नवीन प्रथा प्रशासन सुरू करत आहे.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani