पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाला मिळाले पूर्णवेळ शिक्षणाधिकारी
-महापालिका शिक्षणाधिकारीपदी संजय नायकडे यांची पदोन्नतीने नियुक्ती
पिंपरी | लोकवार्ता-
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाला पूर्णवेळ शिक्षणाधिकारी मिळाले आहेत. महापालिका शिक्षणाधिकारी म्हणून संजय नायकडे यांची पदोन्नतीने नियुक्ती झाली आहे. त्यांच्या नियुक्तीचे आदेश महाराष्ट्र राज्याचे उपसचिव टि. वा. करपते यांनी दिले काढले आहेत.महापालिकेच्या शिक्षण विभागामध्ये प्रशासन अधिकारी म्हणून अतिरिक्त कार्यभार असलेल्या स्मिता गौड यांची बदली झाली आहे. त्यांच्याजागी संजय नायकडे यांची नियुक्ती झाली आहे. महापालिकेच्या शिक्षण विभागामध्ये प्रशासन अधिकारी म्हणून ज्योत्स्ना शिंदे कार्यरत होत्या. तीन वर्षे त्या महापालिकेत कार्यरत होत्या.

पाच महिन्यापूर्वी त्यांची रायगडला बदली झाली. त्यांच्या जागेवर स्मिता गौड यांना अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. आता राज्य शासनाने पूर्णवेळ शिक्षणाधिकारी म्हणून संजय नायकडे यांची नियुक्ती केली आहे.