नवाब मलिक यांच्या अटकेनंतर पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी आक्रमक….!
-ईडी ने कोणतीही नोटीस न पाठवता चौकशीसाठी बोलल्या बद्दल निषेधार्थ केंद्र सरकारच्या व ईडी विरोधात जाहीर निषेध!
पिंपरी । लोकवार्ता-
”शर्म करो, शर्म करो, मोदी सरकार शर्म करो”, ”भाजप वाल्यांचे करायचे काय, खाली डोके वर पाय”, ”नवाबभाई आगे बडो, हम तुम्हारे साथ है”, भाजप सरकार हाय हाय” अशा जोरदार घोषणा देत पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसने अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने केली. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले.

तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर सक्तवसुली संचलनालायने (ईडी) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना आज (बुधवारी) अटक केली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या कारवाईचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध केला जात आहे. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी महापौर योगेश बहल, वैशाली घोडेकर, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, राहुल भोसले, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नाना काटे, मयूर कलाटे, राजू बनसोडे, संजय वाबळे, नगरसेविका संगीता ताम्हाणे, महिला अध्यक्षा कविता आल्हाट, युवक अध्यक्ष इम्रान शेख, माजी नगरसेवक काळुराम पवार, जगनाथ साबळे, तानाजी खाडे, गोरक्ष लोखंडे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती फजल शेख, विजय लोखंडे, कविता खराडे, उज्वला ढोरे, पल्लवी पांढरे आदी कार्यकर्ते आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
