लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

पिंपरी चिंचवड आरक्षण सोडतीने महिला इच्छुकांच्या तयारीचा मार्ग मोकळा

-मात्र २५ नगरसेवकांचा पत्ता कट.

पिंपरी । लोकवार्ता-

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीची ओबीसीविना आरक्षणाची सोडत सोमवारी काढण्यात आली. त्यामुळे किमान महिला इच्छुकांच्या तयारीचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, या आरक्षणामुळे गत टर्ममधील २५ पुरुष नगरसेवकांच्या जागा महिला आरक्षण पडल्याने त्यांना मोठा धक्का बसला असून एक तर त्यांना घरी बसावे लागणार आहे किंवा पर्यायी प्रभाग शोधावा लागणार आहे. तर, या सोडतीमुळे गाववाल्यांची मोठी कोंडी झाली असून विविध पक्षांचे स्थानिक २०२२ ला एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.
पिंपरी पालिकेत २०१७ ला १२८ जागा, तर चार सदस्यांचे ३२ प्रभाग होते. २०२२ ला ही संख्या अनुक्रमे १३९ आणि ४६ झाली आहे. १३९ पैकी ७० जागा महिलांसाठी राखीव आहेत. यावेळी ओबीसी आरक्षण नाही. प्रत्येक प्रभागात एकेक जागा खुली आहे. २५ प्रभागात एससी व एसटी आरक्षण आहे. तेथील महिला आरक्षणासह (११ एससी व दोन एसटी) इतर प्रभागातील सर्वसाधारण महिलांच्या जागा (५७) आज निश्चीत करण्यात आल्या. शाळकरी मुलांच्या हस्ते ही सोडत काढण्यात आली.

शहरातील चिंचवड व भोसरी या भाजप आमदारांच्या मतदारसंघातील काही प्रभागात स्थानिक पुरुष इच्छुकांची या मोठी कोंडी आरक्षणामुळे झाली आहे. कारण तेथे तीनपैकी दोन जागा या महिलांसाठी राखीव झाल्याने याअगोदर तेथे असलेल्या दोनपेक्षा अधिक पुरुष नगरसेवकांचा पत्ता कट झाला आहे. त्यांना शिल्लक एका जागेसाठी तीव्र स्पर्धा करावी लागेल किंवा शेजारच्या प्रभागात घुसखोरी करावी लागेल. एवढेच नाही, तर निवडून येण्यासाठीही त्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. कारण प्रभागातील तीनपैकी एकाच खुल्या जागेवर दिग्गज स्थानिकांच्या उड्या पडणार आहेत.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani