पिंपरी चिंचवड शाळांना सलग दोन दिवस सुट्टी ; मुसळधार पावसामुळे सुट्टी जाहीर
लोकवार्ता: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळांना सलग दोन दिवस सुट्टी असणार आहे. महानगरपालिकेतील प्राथमिक, माध्यमिक आणि खाजगी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये जोरदार पाऊस होत असल्याने शाळकरी मुलांची शाळेला जाताना गैरसोय होत आहे. तसेच येत्या दोन दिवसात अतिवृष्टी होणार असल्यानं महानगरपालिकेने हा निर्णय घेतला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील बालवाडी, अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक तसेच सर्व खाजगी शाळांना सुट्टी घोषित करण्यात आली आहे. दिनांक १३ जुलै ते १४ जुलै या दिवशी शाळांना सुट्टी असेल.