pimpri chinchwad social media 2022 : पिपंरी चिंचवड सोशल मीडिया परिषदेची नवीन कार्यकारणी जाहीर
लोकवार्ता : पिपंरी चिंचवड सोशल मीडिया परिषदेची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. डिजिटल मीडियात काम करत असताना पत्रकारांनी विश्वासार्हता जपली पाहिजे असे प्रतिपादन सोशल मीडिया अध्यक्ष सुरज साळवे यांनी केले आहे.

आज पिंपरी चिंचवड पत्रकार संघ व सोशल मीडिया परिषद यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. डिजिटल मीडियात काम करत असताना पत्रकारांनी विश्वासार्हता जपली पाहिजे असे प्रतिपादन सोशल मीडिया अध्यक्ष सुरज साळवे यांनी केले आहे. कॉपी पेस्ट बातम्या न करता पत्रकारांनी स्वतंत्र बातम्या कराव्यात. काम करत असताना नवख्या लोकांनी जुन्या पत्रकारांचे मार्गदर्शन घ्यावे अशी प्रेमळ सूचना जेष्ठ पत्रकार बाळासाहेब ढसाळ यांनी केली.
आता सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम आहे. परंतू येणाऱ्या काळात अजून मिडियाचे स्वरूप बदलणार आहे. त्यामुळे पत्रकारांनी कार्यरत असणे महत्वाचे आहे अशा भावना जेष्ठ पत्रकार नाना कांबळे यांनी व्यक्त केल्या. पत्रकार हा समाजाचा आरसा आहे. गरिबांच्या अडीअडचणी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या पाहीजेत. सोशल मीडियामुळे लोकशाही बळकट होण्यास मदत झाली आहे. नविन पदाधिकाऱ्यांनी पत्रकार संघटना बळकट करण्यासाठी प्रयत्न करावेत असे मत पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले यांनी व्यक्त केले.
यावेळी साळवे म्हणाले की, डिजीटल क्रांतीमुळे पत्रकारितेचे स्वरूप बदलले आहे. त्यामुळेच पत्रकारांची मातृ संस्था समजल्या जाणाऱ्या मराठी पत्रकार परिषद मुंबई या संघटनेने काही महिन्यापूर्वी सोशल मीडिया परिषद नावाची एक वेगळी विंग तयार करून डिजिटल मिडियात काम करणाऱ्या पत्रकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी काम करत आहे. वेब पोर्टल, यूट्यूब चॅनलचा पत्रकार म्हटल तर वेगळ्या नजरेने बघितल्या जाते त्यामुळे विश्वासार्हता जपणे महत्वाचे आहे. शहरात सोशल मीडिया परिषदेची व्याप्ती वाढत असून डिजिटल मीडियात काम करणाऱ्यांनी संघटनेत येऊन स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करावी. नवीन निवड झालेले पदाधिकारी संघटनेला बळकटी देण्याचे काम करतील असे बोलून पुढील वाटचालीस साळवे यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी मार्गदर्शक म्हणून पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले, जेष्ठ पत्रकार नाना कांबळे, जेष्ठ पत्रकार बाळासाहेब ढसाळ उपस्थीत होते. तसेच पिंपरी चिंचवड पत्रकार संघ व सोशल मीडिया परिषदेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार पत्रकार महावीर जाधव यांनी मानले.
सोशल मीडिया परिषदेची नवीन कार्यकारणी –
१) सुरज साळवे – अध्यक्ष
२) देवा भालके – उपाध्यक्ष
३) अविनाश पर्बत – उपाध्यक्ष
४) महावीर जाधव – उपाध्यक्ष
५) गणेश मोरे – कार्याध्यक्ष
६)अशोक कोकणे – प्रवक्ता
७) राकेश पगारे – चिटणीस
८) सागर बाबर – सरचिटणीस
९)सिताराम मोरे – खजिनदार
१०) संतोष गोतावळे – सह खजिनदार
११) मुझफ्फर इनामदार – सह खजिनदार
१२)राम बनसोडे – सहसचिव
१३) मनोज शिंदे – प्रसिद्धी प्रमुख