“पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने 1 हजारहून अधिक वाहनचालकांवर कारवाई करत दंड आकाराला”
-कारवाईतून सुमारे 18 लाख 9000 रुपये दंड वसुल करण्यात आला आहे.
पिंपरी | लोकवार्ता-
बेधुंद पद्धतीने वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांवर परिवहन कार्यालयाकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे. सातत्याने वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या 1 हजार 239 कार चालकांवर पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कारवाई करत दंड आकाराला आहे. पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकांनी, इंटरसेप्टर वाहनांत बसविण्यात आलेल्या स्पीडगनच्या पुणे-नाशिक व पुणे मुंबई महामार्गांवर ठरवून दिलेल्या वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे.

वाहन धारकांनी वेग मर्यादेचे पालन करणे गरजेचे आहे . आतापर्यंत 18 लाखाहून अधिक दंड वसूल फेब्रुवारी महिन्यात 1 हजार 239 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. 1 हजार 998 चारचाकी वाहनांवर दंडात्मक करण्यात आली आहे. या कारवाईतून सुमारे 18 लाख 9000 रुपये दंड वसुल करण्यात आला आहे. वाहन धारकांनी वेग मर्यादेचे पालन करणे गरजेचे आहे. अनेक वेळा वेग जास्त असल्याने अपघाताचे प्रमाण सर्वाधिक आहे. वाहन चालकांनी वेगमर्यादेचे पालन करावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी अतुल आदे यांनी केली आहे.