लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

पिंपरी-चिंचवड करांना गुंठेवारी बांधकाम नियमितसाठी जून अखेर ची मुदतवाढ

-प्रशासनाचे पिंपरी-चिंचवड करांना मोठं गिफ्ट.

पिंपरी । लोकवार्ता
पिंपरी चिंचवड परिसरातील गुंठेवारीनुसार बांधकामे नियमित करण्यास प्रशासनाने जूनअखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील 31 डिसेंबर 2020 पूर्वीची अनधिकृत बांधकामे गुंठेवारी पद्धतीने नियमित करण्यासाठी अर्ज करण्याकरिता आणखी दोन महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. 30 जूनपर्यंत नागरिकाना अर्ज करता येतील, अशी माहिती बाधकाम परवानगी विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान 20 डिसेंबर 2021 पासून चार महिन्यात नियमितीकरणासाठी केवळ 950 अर्ज आले आहेत. नागरिकानी पाठ फिरवल्याने मुदतवाढ देऊनही योजनेला वेग येत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शहरात एक लाखाहुन अधिक अनधिकृत बांधकामे आहेत. काही कागदपत्राची पूर्तता करत ती नियमित करण्यासाठी योजना सुरू करण्यात आली आहे, मात्र त्याला प्रतिसाद दिसत नसल्याचे चित्र आहे.

जाणून घ्या कोणती कागदपत्रे आवश्यक आहे ?

नागरी सुविधा केंद्रात सध्या अर्ज स्वीकारले जात आहेत. या अर्जासोबत मालकी हक्कासाठी सातबारा उतारा त्यासोबतच इतर महत्त्वाची कागदपत्रे, बांधकाम 31 डिसेंबर 2020पूर्वी बांधून पूर्ण झाल्याबाबतचा कर संकलन विभागाचा दाखला, मान्यताप्राप्त स्ट्रक्चरल इंजिनिअरकडून स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी दाखला, पाणीपुरवठा थकबाकी नसलेला दाखवा, जलनिस्सारण विभागाचा ड्रेनेज कनेक्शन दाखला, इमारतीचा प्लॅन, क्रॉस सेक्शन, साइट प्लॅन यासह विविध दाखले आणणे गरजेचे आहे.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani