Pimpri Chinchwad traffic : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक बदल
लोकवार्ता : चिंचवडमध्ये गणेशोत्सवाच्या नवव्या दिवशी होणाऱ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनामुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. याबाबत आनंद भोईटे (पोलीस, उप-आयुक्त वाहतूक शाखा, पिंपरी चिंचवड शहर) यांनी आदेश दिले. अत्यावश्यक सेवेतील वाहनां व्यतिरिक्त इतर वाहनांना हे नियम लागू असतील.

दळवी नगर ब्रिजकडून चाफेकर चौकाकडे येण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी असेल. या वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. त्यांनी एस के एस टोकाकडून बिजलीनगर मार्गे इच्छित स्थळी जावे. चिंचवडमधील अहिंसा चौक ते चाफेकर चौकाकडे येण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी असेल. या वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. त्यांनी एसकेएफ चौकातून खंडोबा माळकडून मुंबई पुणे हायवे रोडने इच्छित स्थळी जावे.
वाल्हेकर वाडी टी जंक्शन कडून चाफेकर चौकाकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी असेल. या वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. त्यांनी वाल्हेकर वाडी जुना जकात नाका येथून डावीकडे वळून जय शाळेपासून बिजलीनगर अथवा एस के एस मार्गे खंडोबा माळ मार्गे इच्छित स्थळी जावे.
सोनाली कुलकर्णीचा गुलाबी ड्रेसमध्ये हटके लुक
लिंक रोड वरून चाफेकर (Pimpri Chinchwad traffic) चौकातील पीएमटी बस स्टॉप येथून चाफेकर चौकात जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी असेल. या वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. लिंक रोडने येणाऱ्या वाहन चालकांनी डावीकडे वळून काळेवाडी मार्गे इच्छित स्थळे जावे.
भुई अळी तसेच चिंचवड चौकी येथून चाफेकर चौकात जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी असेल. या वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. ही वाहने केशवनगर मार्गे याची स्थळी जातील.
चिंतामणी चौक वाल्हेकर वाडी रिव्हर (Pimpri Chinchwad traffic) व्ह्यू चौकाकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी असेल. या वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. ही वाहने रिव्हर व्ह्यू चौकाकडून वाल्हेकरवाडी मार्गे इच्छित स्थळी व अहिंचा चौक ते महावीर चौक किंवा एसकेएफ चौक मार्गे इच्छित स्थळी जातील. चिंचवड वाहतूक विभागाच्या हद्दीत गणपती विसर्जन व मिरवणूक असल्याने 9 सप्टेंबरला दुपारी 3 ते मध्यरात्री 12 पर्यंत वरील प्रमाणे वाहतूक नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असे वाहतूक विभागाने सांगितले आहे.