लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

महापालिका करसंकलन विभागात “गोलमाल है, सब गोलमाल है..!” दोन कर्मचारी सापडले एसीबी च्या जाळ्यात..!

‘करसंकलनची जबाबदारी सक्षम अधिकाऱ्याकडे सोपवा’ नगरसेवक विकास डोळस यांची मागणी

पिंपरी: लोकवार्ता प्रतिनिधी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागातील दोन कर्मचा-यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) नुकतेच लाच घेताना रंगेहाथ पकडले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या थेरगाव कर संकलन कार्यालयातील लिपिक प्रदीप शांताराम कोठावडे आणि मुख्य लिपिक हायबती मोरे या दोन कर्मचा-यांना ‘एसीबी’ने धाड टाकून लाच घेताना रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर महापालिका करसंकलन विभाग प्रशासनावर नागरिकांकडून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. एकंदरीतच महापालिकेच्या करसंकलन विभागातील हा ‘भ्रष्टाचाराचा गोलमाल’ सर्वसामान्यांना नकोसा झाला असून या विभागाच्या प्रमुख पदावर बसलेल्यांनीच जाणीवपूर्वक नागरिकांना लुटण्यासाठी चालवलेली ही खेळी आहे आणि अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या जागी तात्काळ सक्षम अशा प्रामाणिक अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी अशी नागरिकांची मागणी आहे.

याबाबत नगरसेवक विकास डोळस यांनी सांगितले की, आम्ही महापालिकेच्या करसंकलन विभागातील विविध गैरप्रकारांबद्दल सातत्याने महापालिका आयुक्तांशी पत्रव्यवहार केला आहे, जेव्हा मिळकतींचे सर्वेक्षण करण्याचे काम खाजगी संस्थेला देण्याचा घाट घातला गेला तेव्हाही आम्ही त्याला जाहीर विरोध केला. पुढे त्या खाजगी सर्वेक्षणातूनच एकूण 19 हजार 500 मिळकतीची नोंद नसून त्यातील 6028 निवासी मिळकती शिल्लक असल्याचे दिसून आले, शिवाय 51 औद्योगिक मिळकतीचीही नोंद नसल्याचे स्पष्ट झाले.

ज्या खात्यात सर्वसामान्य शहरवासीय आपला मिळकत कर भरतो ते खाते बँक ऑफ बडोदा या विश्वसनीय शासकीय बँकेऐवजी इतर खाजगी बँकेकडे देण्याला ही आम्ही कडाडून विरोध केला आहे.

म्हणजेच महापालिका करसंकलन विभागाची आतापर्यंतची कार्यपद्धती ही संशयास्पद असून सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने त्रासदायक व भ्रष्टाचारी असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे आणि आज एसीबी च्या कारवाईनंतर त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे, एकंदरीतच करसंकलन विभाग त्या विभागप्रमुखांच्या कंट्रोल मध्ये नसून त्यांचा हेतू काही वेगळाच होता की काय? असा प्रश्न उपस्थित होतो, तसेच तात्काळ महापालिका करसंकलन विभागाची जबाबदारी सध्याच्या विभागप्रमुखांकडून काढून घ्यावी व सक्षम अशा अधिकाऱ्यांकडे सोपवावी अशी मागणी आयुक्त राजेश पाटील यांना नगरसेवक विकास डोळस यांनी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातुन केली.

“करसंकलन विभागातून सर्वसामान्यांच्या फाईल्स होतात गायब..!”

पिंपरी-चिंचवड महापालिका कर संकलन कार्यालयातून मालमत्तेच्या फाईल गायब झाल्याच्या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी भाजपा नगरसेवक विकास डोळस यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या वतीने शहरातील नोंद नसलेल्या बांधकामांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. ज्या नागरिकांनी आपल्या मिळकतींची नोंद केलेली नाही. त्यांच्या फाईल तयार केल्या आहेत. त्यापैकी काही फाईल पिंपरी येथील करसंकलन कार्यालयातून गायब झाल्याच्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही बाब कर संकलन विभागाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. त्यामुळे सदर प्रकरणाची सखोल चौकशी करुन संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे. पिंपरी येथील करसंकलन कार्यालयातून १४ फाईल गायब झाल्या होत्या. त्यापैकी ९ फाईल गोडावूनमध्ये मिळाल्याचा दावा प्रशासन करीत आहे. मात्र, संबंधित नागरिक सातत्याने कार्यालयात कर भरण्यासाठी येत आहेत. मात्र, फाईल न सापडल्यामुळे त्यांच्या मालमत्तेची नोंद करण्यात अडचणी येत असल्याची चर्चा आहे. त्यामूळेच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागातून सर्वसामान्य नागरिकांच्या फाईल्स गायब होतात कशा?? याबाबत महापालिका वर्तुळात वेगवेगळ्या गूढ चर्चा रंगल्या आहे, या फाईल्स जाणीवपूर्वक गहाळ तर केल्या जात नाहीत ना.. की त्या मागेही या करसंकलन विभागाच्या कर्मचारी व प्रमुखपदी विराजमान अधिकाऱ्यांचा काही सुप्त मनसुबा तर नाही ना अशा शंका नागरिक आता उपस्थित करू लागले आहेत.

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani