पिंपरी-चिंचवड वल्लभनगर आगार ते सिंदखेड राजा बुलढाणा बससेवा सुरु ; आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार
लोकवार्ता : पिंपरी-चिंचवड वल्लभनगर आगार ते सिंदखेड राजा बुलढाणा या मार्गावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून ‘‘ जिजाऊ एक्सप्रेस ’’ आजपासून धावणार आहे. अनेक शिवप्रेमी आणि सामान्य प्रवाशांच्या सेवेसाठी हि बससेवा सुरु करण्यात आली आहे.

भोसरीचे आमदार आणि पिंपरी चिंचवड भाजप शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या हस्ते या बसचा लोकार्पण सोहळा वल्लभनगर एसटी डेपो येथे आज सकाळी करण्यात आला. पिंपरी-चिंचवड वल्लभनगर – अहमदनगर- छत्रपती संभाजीनगर -जालना- सिंदखेड राजा – देऊळगाव कोळ या मार्गावर ही लांब पल्ल्याची बस धावणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना आता दिलासा मिळाला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून या भागातील प्रवाशांची बस आभावे गैरसोय होत होती. हि बससेवा सुरु झाल्यामुळे आता नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.