लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

“पिंपरी-चिंचवडकरांच्या समस्या एकाच छताखाली सुटणार”

-मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांचा जनता दरबार

पिंपरी | लोकवार्ता-

1 मार्च – पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना येणा-या समस्या सोडविण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांच्या पुढाकाराने पिंपरी चिंचवड शहरात जनता दरबार आयोजित केला आहे. या दरबारात महापालिका, पीएमआरडीए, पोलीस आणि अन्य सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सर्व समस्या एकाच छताखाली सुटणार आहेत.

गुरुवारी (दि. 3 मार्च) सकाळी 11 ते 1 या कालावधीत सिझन बँक्वेट, आकुर्डी चौक येथे हा जनता दरबार होणार आहे.पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्याबाबतच्या अनेक तक्रारी खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडे नागरिकांनी मांडल्या आहेत. तसेच काही अडचणी सांगण्यासाठी नागरिक अजूनही पुढे येत नाहीत. त्यामुळे या सर्व अडचणी सोडविण्यासाठी सर्व शासकीय अधिकारी एकाच ठिकाणी बोलावून समस्या मार्गी लावण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांच्या पुढाकाराने पिंपरी चिंचवड शहरात जनता दरबार आयोजित केला आहे.

After Shrirang Barne's complaint: Probe into violations by group in Wakad,  Charholi | Cities News,The Indian Express

पिंपरी चिंचवड महापालिकेशी संबंधित आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, कर संकलन, विद्युत, नागरवस्ती, अन्नधान्य विभाग (रेशनिंग), तहसील, पीएमआरडीए, आरटीओ, पोलीस प्रशासन व अन्य तक्रारींच्या संदर्भात सर्व अधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनी या दरबारामध्ये येऊन आपल्या समस्या मांडाव्यात. त्यावर संबंधित अधिकारी काय कार्यवाही करता येईल, त्याबाबत माहिती देतील. अनेक वेळेला नागरिक शासकीय कार्यालयात जातात. मात्र संबंधित अधिकारी न भेटल्यामुळे नागरिकांची सरकारी कार्यालयातील फेरी वाया जाते. याचा नागरिकांना नाहक त्रास होतो. अनेक ज्येष्ठ नागरिक वारंवार सरकारी कार्यालयात चकरा मारू शकत नाहीत. त्यांच्यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांचा जनता दरबार एक संधी असणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या दरबारात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani