१ जूनपासून शहरातील ‘हॉटेलिंग’ महागणार…
लोकवार्ता : येत्या १ जून पासून शहरातील ‘हॉटेलिंग’ महागणार आहेत. वाढत्या महागाईबरोबर आता गॅस च्या किंमतीत वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आता शहरातील हॉटेलच्या दारात १०% ची वाढ करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पिंपरी चिंचवड हॉटेल अँड रेस्ट्रॉरंट असोशिएशनचे अध्यक्ष पद्मनाथ शेट्टी, गोविंद पानसरे यांनी दिली.

येत्या १ जून पासून शहरातील ‘हॉटेलिंग’ महागणार आहेत. वाढत्या महागाईबरोबर आता गॅस च्या किंमतीत वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आता शहरातील हॉटेलच्या दारात १०% ची वाढ करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पिंपरी चिंचवड हॉटेल अँड रेस्ट्रॉरंट असोशिएशनचे अध्यक्ष पद्मनाथ शेट्टी, गोविंद पानसरे यांनी दिली.
हॉटेल असोशिएशनने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, देशातील तसेच राज्यातील इंधन, गॅस सिलेंडरची दरवाढ, सीएनजी दरातील वाढ, विद्युत दरवाढ मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याचबरोबर अनेक राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या करांमध्ये भरमसाठ वाढ झाली आहे.
कोरोनानंतर महागाई आकाशाला भिडलेली आहे. वाहतुकीच्या दरात वाढ झाली आहे. मालवाहतुक महागली आहे. तसेच हॉटेल व्यावसायिकांना कारागीर, मजूर उपलब्ध होणे अवघड झाले आहे. याबाबत न्याय मिळवण्यासाठी केंद्र, राज्य सरकार व स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याकडे उपाययोजनाची मागणी करत आहोत. तथापि, कच्या मालाच्या दरवाढीसह सर्व बाबींचा विचार पूर्वीच्या दराने देणे कठीण झाले आहे. त्यामुळे 1 जून 2022 पासून पिंपरी-चिंचवड हॉटेल मधील सर्व व्यावसायिक सध्याच्या दरामध्ये 10 टक्क्यांनी वाढ करणार आहे.