पिंपरीत खास तृतीय पंथीयांना मेट्रो राईड चे आयोजन
लोकवार्ता
तृतीय पंथीयांना समाजातील मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शुक्रवारी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांच्या संकल्पनेतून खास तृतीयपंथी लोकांसाठी पीएमपीएमएल बस आणि मेट्रो राईडचे आयोजन करण्यात आले. यात उपायुक्त अजय चारठाणकर यांनी पुढाकार घेतला. तृतीय पंथीय समाजाने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा सहजतेने वापर करावा यासाठी हे प्रयोजन करण्यात आले.

आज समाजातील सर्व थरातील लोकांना ताठ मानेने वावरण्याचा अधिकार आहे. त्यातच तृतीय पंथीय लोकांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन सकारात्मक व्हावा यासाठी महापालिकेने हे पाऊल उचलले आहे. याप्रसंगी मेट्रो चा प्रवास करण्यासाठी शहरातील तृतीयपंथी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तृतीयपंथी नागरिकांना पीएमपीएमएल बस ने भक्ती शक्ती, निगडी टर्मिनल वरून पीसीएमसी मेट्रो स्टेशनपर्यंत आणण्यात आले. त्यानंतर पीसीएमसी ते फुगेवाडी मेट्रो स्टेशनपर्यंत मेट्रोची सफर करण्यात आली. या उपक्रमाने आम्हाला समाजातील इतर घटकांप्रमाणे सामावून घेतल्याबद्दल तृतीयपंथी लोकांनी पालिकेचे आभार मानले.