“शहरात प्लेगेथॉन मोहिमेला सुरुवात”
नागरिकांनी दिला उत्स्फूर्त सहभाग.
पिंपरी ।लोकवार्ता-
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आज सकाळी 7 वाजता शहरात प्लॉगेथॉन मोहिमेला सुरुवात झाली. प्लॉगेथॉन मोहिम शहरातील 32 प्रभागातील 64 ठिकाणी राबविण्यात येत असून, या अंतर्गत शहरातील कचरा गोळा केला जातो आहे. दरम्यान, शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे ‘प्लॉगेथॉन’मध्ये सहभाग नोंदवला.

पिंपरी-चिंचवड शहर झपाट्याने नागरिकरणाकडे वाटचाल करीत आहे. त्यादृष्टीने महापालिकेने विकासाची कामेदेखील केली आहेत. या शहराच्या गरजा ओळखून महापालिका नियोजन करीत आहे. नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी योजना, प्रकल्प, उपक्रम आदी बाबी महत्वपूर्ण आहेत. विकासाबरोबरच आपले शहर स्वच्छ आणि सुंदर असावे यासाठी महापालिकेने स्वच्छतेविषयक जनजागृती करीता रविवारी प्लॉगेथॉन मोहिम आयोजित करण्यात आली आहे.
नागरिकांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद


