पर्यावरण दिनानिमित्त उद्या प्लास्टिक मुक्त शहर अभियान
इंद्रायणी व मुळा नदीकाठ स्वच्छ करण्याची मोहीम.
मोशी । लोकवार्ता
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने हाती घेतलेल्या प्लास्टिक मुक्त शहर अभियानांतर्गत उद्या शनिवार दिनांक 4 जून, रोजी सकाळी शहरातल्या तीन नद्या पवना इंद्रायणी आणि मुळा नदीकाठावर रिव्हर प्लॉगॅथॉन अंतर्गत नदीकाठ स्वच्छ्ता मोहीम राबवण्यात येणार आहे. सर्वांनी या मोहिमेत जरूर सहभागी होऊन नदीकाठी असलेला प्लास्टिक कचरा संकलन करण्यास मदत करण्याचे आवाहन फेडरेशन मार्फत करण्यात आले आहे.

स्वच्छताभियान राबण्यात येणारे ठिकाण
१) रिव्हर रेसिडन्सी शेजारी इंद्रायणीनदी लगतचा परिसर
2) मोशी घाट , डुडुळगाव घाट इंद्रायणीनदी लगतचा परिसर
3) भैरवनाथ मंदिर मोई फाटा
4) चिखली स्मशानभूमी सोमरील मोकळी जागा
वेळ शनिवार 4 जून 2022 सकाळी 7.30 वाजता