देहूतील कार्यक्रमात मुख्यमंत्री नसणार; उमपमुख्यमंत्री अजित पवार असणार उपस्थित
लोकवार्ता : आज होणाऱ्या देहूतील शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत. यावेळी यांची जाहीर सभा घेण्यात आली आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नसणार आहेत.
आज होणाऱ्या देहूतील शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत. यावेळी यांची जाहीर सभा घेण्यात आली आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नसणार आहेत. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान पुण्यातील कार्यक्रमात हजार नसण्याची ही पहिलीच घटना नाही. पुण्यात झालेल्या बऱ्याच कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर दिसले नाहीत. मात्र या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार हजेरी लावणार आहेत.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते देहूतील तुकाराम महाराज मूर्ती आणि शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर पंतप्रधानांची जाहीर सभा होणार आहे. देहूतील वारकरी संप्रदायाला आज पंतप्रधान संबोधित करतील.