PM MODI : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी पीएमपी कडून २० ई-बस सुविधा
लोकवार्ता : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते देहूतील तुकाराम महाराज मूर्ती आणि शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते देहूतील तुकाराम महाराज मूर्ती आणि शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर पंतप्रधानांची जाहीर सभा होणार आहे. सभेचे आयोजन करण्यात आलेले ठिकाण ते वाहन पार्किंग यात दीड किलोमीटरचे अंतर असल्याने नागरिकांची त्या ठिकाणी जाताना गैरसोय होऊ नये म्हणून पीएमपी प्रशासनाकडून २० ई-बस सोडल्या जाणार आहेत. पीएमपी चे मुख्य वाहतूक व्यवस्थापक दातात्रेय झेंडे यांनी याबाबत माहिती दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हेलिकॉर्टर मधून उतरल्यानंतर त्यांच्या उपस्थितीत देहू गावातील संत तुकाराम महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. हे सर्व कार्यक्रम झाल्यानंतर देहू गावातील माळवाडी याठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे या सभेला जाणा-नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पीएमपी प्रशासनाने बस सोडण्याचा निर्णय घेतला.