चिखली-स्वारगेट बस चालू करण्याची चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनची मागणी
लोकवार्ता –
PMPML ची चिखली ते स्वारगेट बस जाधववाडी-बोऱ्हाडेवाडी, शिवरोड, वूड्सविले फेज – १ रोड या मार्गाने चालू करावी अशी मागणी चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन ने केली. चिखली, जाधववाडी, बोऱ्हाडेवाडी, मोशी या परिसरात मोठ्या प्रमाणात सहकारी गृहनिर्माण संस्था झाल्या आहेत. या सोसायट्यांमध्ये ३० ते ३५ हजारहुन अधिक लोकसंख्या राहते. येथील नागरिकांना नोकरी, व्यवसायाच्या निम्मिताने पुणे शहर आणि जवळपासच्या परिसरात जावे लागते. त्यामुळे येथील भागात बस सेवा मिळावी.

या भागात वयोवृद्ध, विद्यार्थी, माता भगिनींची बस अभावी प्रवास करताना मोठ्या अडचणी येत आहेत. त्यामळे पुणे महानगर परिवाहन महामंडळाची चिखली ते स्वारगेट बस जाधववाडी-बोऱ्हाडेवाडी, शिवरोड, वूड्सविले फेज – १, स्वराज्य सोसायटी रोड मार्गे चालू करावी अशी मागणी केली आहे. या बस सेवेने अनेक नागरिकांची गैरसोय टाळली जाणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर बस सेवा चालू करावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.