पीएमपी चा मोठा निर्णय! पुण्यात प्रदूषण निर्माण करणाऱ्या पीएमपी गाड्या ताफ्यातून काढून टाकण्याचा निर्णय
-वाढते प्रदूषण कमी कारणासाठी तसेच इलेक्ट्रिक वाहनाचा ताफा वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे | लोकवार्ता-
पुण्यात सार्वजनिक वाहतुकीसाठी पीएमपी बसेसचा अधिक वापर केला जातो. पीएमपीच्या ताफ्यातील अनेक पीएमपी बसेस डिझेलवर चालणाऱ्या आहेत. साहजिक या गाड्याच्या धुरामुळे शहारातील प्रदूषण वाढण्यास मोठी मदत होत आहे.मात्र पीएमपीने आता प्रदूषण निर्माण करणाऱ्या गाड्या ताफ्यातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. वाढते प्रदूषण कमी कारणासाठी तसेच इलेक्ट्रिक वाहनाचा ताफा वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.ताफ्यात फक्त 233 मिडी बसच डिझेलवरील उरल्या असून, त्यादेखील इलेक्ट्रिक करण्याचा पीएमपीचा प्रस्ताव आहे. त्यामुळे यापुढे धूर सोडत धावणारी पीएमपी नागरिकांच्या नजरेस पडणार नाही.

पीएमपीच्या ताफ्यात एनजीवरील बसचा समावेश झाला. त्यानंतर आता इलेक्ट्रिक बस ताफ्यात दाखल होत आहेत. पीएमपीचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी पदभार स्वीकारताच सर्व डिझेलवरील बस ताफ्यातून काढून पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक पुरविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ताफ्यातील सर्व डिझेल बस काढण्यात आल्या आहेत. डिझेलवर धावणार्या आता फक्त मिडी बसच पीएमपीच्या ताफ्यात आहेत.