व्यसनमुक्ती सायकल रॅलीत पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांचा सहभाग
‘थिंक हेल्थ नॉट ड्रग्स’, ‘देऊ आयुष्याला आकार करु व्यसनमुक्तीचा स्विकार’

लोकवार्ता । प्रतिनिधी
पिंपरी : जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन व अवैध्य वहातूक विरोधी दिन २६ जून रोजी साजरा केला जातो. या निमित्त स्माईल व्यसनमुक्ती केंद्र, रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी व पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्माईल सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

सायकल रॅलीत पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी सहभाग घेतला होता. पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय येथून शनिवारी सकाळी सात वाजता ही रॅली सुरु झाली व भक्ती शक्ती मार्गे, सोमाटणे फाटा असे मार्गक्रमण करत तळेगाव येथील नाना नानी पार्क येथे सकाळी आठ वाजता संपन्न झाली सायकल रॅलीचा फ्लॅग होस्टिंग उपप्रांतपाल रो गणेश कुदळे व पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या हस्ते झाले.

यावेळी ‘थिंक हेल्थ नॉट ड्रग्स’, ‘देऊ आयुष्याला आकार करु व्यसनमुक्तीचा स्विकार’ अशा घोषणा देऊन चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा परिसर दुमदुमून गेला. रोटरीचे अध्यक्ष रो. संतोष शेळके यांनी आपल्या भाषणात व्यसनमुक्ती केंद्र ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन केले. स्माईलचे संस्थापक अध्यक्ष हर्षल पडित यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. स्माईल सायकल रॅलीच्या समारोप कार्यक्रमात बोलताना कृष्णप्रकाश यांनी उदाहरणासहित व्यसनमुक्तीचे महत्व अधोरेखित केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रो. दिलीप पारेख आणि रो दिपक फल्ले याचे मार्गदर्शन मिळाले कार्यक्रमासाठी स्माईलचे अमोल कुलकर्णी, राहुल केळकर, प्रशात खर्जुले, सचिन कांबळे, रोहित जोगळेकर, जयवंत कांबळे, प्रकाश ढिडे आणि बाबासाहेब कांबळे याचे सहकार्य लाभले. तसेच उर्से गावचे सामाजिक कार्यकर्ते मारुतीराव कारके यांचे योगदान लाभले. स्माईल व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक अध्यक्ष हर्षल पंडित यांनी सर्वाचे स्माईलचे सर्टिफिकेट देऊन आभार मानले कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रो किरण ओस्वाल व आभार प्रदर्शन रो. प्रशात ताये यानी केले.