राजकीय पक्षांची ओबीसींना त्यांचा कोटा देण्याची तयारी सुरू
-पिंपरी-चिंचवडची अनुसूचित जाती, जमाती व महिलांसाठीच्या जागांसाठी सोडत काढली जाणार आहे.
पिंपरी । लोकवार्ता –
ओबीसी राजकीय आरक्षण मुद्दा संपुष्टात आला असला तरी ते परत मिळण्याचीअपेक्षा राजकीय पक्षांना आहे. तर राज्यात महापालिका निवडणूकाही जाहीर झाल्या आहेत. अशातच राजकीय पक्षांनी ओबीसींना त्यांचा कोटा देण्याची तयारी सुरू केली आहे.
पिंपरी-चिंचवडची अनुसूचित जाती, जमाती व महिलांसाठीच्या जागांसाठी सोडत काढली जाणार आहे.त्यातच निवडणूक आयोगाकडून केव्हाही निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यताही शक्यता आहे. मध्यप्रदेशमध्ये ओबीसींना आरक्षण मिळाले, तसे आपल्यालाही मिळेल, अशी अपेक्षा राजकीय पक्षांकडून व्यक्त केली जात आहे. त्यासाठी लागणारा इम्पेरिकल डेटा लवकरात लवकर न्यायालयात सादर करून त्यावर १५ जूनला निकाल लागणे अपेक्षित आहे.

तरीही ओबीसींना आरक्षण मिळाले नाही तर ओबीसींना त्यांच्या कोट्यानुसार उमेदवारी द्यायची, अशी भूमिका राजकीय पक्षांनी घेतली आहे. त्यासाठी संभाव्य उमेदवारांची चाचपणीही राजकीय पक्षांकडून सुरू झाली आहे. २०१७ च्या निवडणुकीत ३५ जागा ओबीसींसाठी राखीव होत्या. त्यावेळी महापौरपदाचे आरक्षणही ओबीसी पुरुष जागेसाठी निघाले होते. त्यामुळे सत्ताधारी भाजपने चऱ्होलीतील नितीन काळजे आणि नंतर चिखलीतील राहुल जाधव यांना संधी दिली.