गोरगरीब जनतेला लवकरात लवकर लसीकरण करावे – विकास साने
सामाजिक कार्य करत असताना मी समाजाचा, गोरगरीब जनतेचा काहीतरी देने लागतो

लोकवार्ता।प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त व महापौर यांना भेटुन शहर आणि शहराला लागून असलेल्या देहू-आळंदी तीर्थक्षेत्र मधील अनाथ,गोरगरीब,भिक्षुक,चौकात दोन वेळची पोटाची भुक भागवण्यासाठी वणवण करणारे भिक्षुक यांना कोरोना लसीकरणाच्या दृष्टीने पालिका प्रशासनाने योग्य ती पावले उचलत त्यांच्याही लसीकरणास प्राधान्य द्यावे असे आव्हाहन करत विनंतीपत्र विकास साने यांनी दिले.

लहान मुलांना,अंध-अपंग व्यक्तींना कोरोना होण्याची जास्त शक्यता आहे.आणि ते परत भिक्षा मागत असताना त्यांच्या संपर्कातून इतरांना सुद्धा त्याचा फैलाव होऊ शकतो. या भिक्षुक,गोरगरीब जनतेकडे आधार कार्ड, पॅनकार्ड नाहीत त्यामुळे त्यांना लस घेता येत नाही,त्यासाठी सुद्धा पालिका आणि प्रशासनाने उपाययोजना करावी, तसेच या सर्व लोकांसाठी स्वतंत्र किंवा सध्या चालु असलेल्या लसीकरण केंद्रात लस देता येत असेल तर त्या सर्व नागरिकांना मी स्वतः त्याठिकाणी लसीकरणासाठी आणण्याची-सोडण्याची तसेच त्यांच्या नाश्त्याची व्यवस्था करेल, त्यासाठी तुम्ही त्यांच्यासाठी लसीकरण केंद्र उपलब्ध करून द्यावे अशी विनंती विकास साने यांनी केली.
सामाजिक कार्य करत असताना मी समाजाचा, गोरगरीब जनतेचा काहीतरी देने लागतो याच भावनेने आज मला त्या व्यक्तींबद्दल तसेच त्या लहान मुलांच्या प्रति तळमळ निर्माण झाली व त्याच भावनेने त्यांना सुद्धा लसीकरण गरजेचे आहे असे जाणवले. तरी माझी पालिकेला आणि प्रशासनाला नम्र विनंती आहे की आपण यावर नक्की सकारात्मक विचार करून या घटकातील लोकांना सुद्धा न्याय द्यावा व त्यांचे लसीकरण लवकरात लवकर करून घ्यावे. असेही विकास साने यांनी सांगितले.