दिशा सोशल फाऊंडेशनच्या वतीने प्रवीण तरडे यांचा दिशा कार्यगौरव पुरस्काराने सन्मान
खासदार श्रीरंग बारणे व आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते सन्मान देण्यात आला.
पिंपरी । लोकवार्ता-
दिशा सोशल फाऊंडेशनच्या वतीने चिंचवड येथे खासदार श्रीरंग बारणे व आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते तरडे यांचा ‘दिशा कार्यगौरव’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.सरसेनापती हंबीरराव मोहिते हा आगामी मराठी चित्रपट हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांच्या तोडीस तोड असून मराठीतील सर्वाधिक खर्चिक चित्रपट झाला आहे, असेही ते म्हणाले. ज्या देशातील शेतकरी वर्ग सुखी असेल तोच देश निश्चितपणे सुखी असेल. जर शेतकरीच दु:खी राहिला तर तो देश सुखी असू शकत नाही, असे स्पष्ट मत प्रसिध्द अभिनेता, लेखक, दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी चिंचवड येथे बोलताना व्यक्त केले.

प्रवीण तरडे म्हणाले कि, मी सर्वप्रथम शेतकरी आहे. सिनेमाच्या माध्यमातून शक्य तितक्या शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या आहेत. यापुढेही शेतकऱ्यांच्या समस्या प्राधान्याने मांडत राहणार आहे. या देशात सगळे मिळेल पण शुद्ध अन्न मिळणार नाही. ते शेतकरीच देऊ शकणार आहे. त्यासाठी शेती विकू नका, व्यसन करू नका, वाईट मार्गाला लागू नका, असा संदेशही तरडे यांनी दिला. आगामी काळात छत्रपती शिवाजी महाराजांचे शेती धोरण समाजापुढे आणायचे आहे. यापूर्वी ते कोणीच सांगितले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य काळात राबवलेली “ऐन जिन्नस शेती कर्ज पद्धत” ही शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मार्गदर्शक ठरू शकते, असेही ते म्हणाले.
प्रवीण तरडे यांनी त्यांच्या चित्रपटांद्वारे वस्तुस्थिती मांडण्याचे काम केले आहे. त्यामुळेच आतापर्यंतच्या त्यांच्या सर्व कलाकृती यशस्वी ठरल्या आहेत. हंबीरराव देखील उत्तम चित्रपट असेल-खासदार श्रीरंग बारणे
तरडे यांच्या मुळशी पॅटर्न मधील “जमीन विकायची नसते, तर राखायची असते” या संदेशातून अनेकांना प्रेरणा मिळाली व त्यांनी जमीन विकण्याचा निर्णय बदलला- महेश लांडगे